इंग्रजीला अनुदानाचे विधेयक संमत करूनच दाखवा!

By Admin | Updated: November 25, 2015 01:15 IST2015-11-25T01:15:05+5:302015-11-25T01:15:18+5:30

पणजी : राज्यातील १३२ इंग्रजी प्राथमिक शाळांना दिले जाणारे अनुदान सरकारने बंद करावे म्हणून भारतीय भाषा सुरक्षा

Show English by granting subsidy bill! | इंग्रजीला अनुदानाचे विधेयक संमत करूनच दाखवा!

इंग्रजीला अनुदानाचे विधेयक संमत करूनच दाखवा!


४ भाषाप्रेमींचा इशारा
४ आंदोलनाचा दुसरा टप्पा रविवारपासून
पणजी : राज्यातील १३२ इंग्रजी प्राथमिक शाळांना दिले जाणारे अनुदान सरकारने बंद करावे म्हणून भारतीय भाषा सुरक्षा मंच आंदोलन तीव्र करणार आहे. आंदोलनाचा दुसरा टप्पा येत्या रविवारपासून (दि. २९) सुरू होणार आहे. तथापि, इंग्रजी शाळांचे अनुदान सुरू ठेवावे म्हणून भाजपच्या आमदारांनी ‘फोर्स’ संघटनेला दिलेल्या आश्वासनानुसार विधेयक संमत करण्याचा प्रयत्न करूनच दाखवावा, असा इशारा भाषा सुरक्षा मंचने
दिला आहे.
उदय भेंब्रे, प्रा. माधव कामत, पुंडलिक नाईक, अरविंद भाटीकर, सुभाष वेलिंगकर, नागेश करमली, सुभाष देसाई, फा. मावजीन आताईद आदींनी मंगळवारी येथे संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाषा सुरक्षा मंचने आंदोलनाचा पहिला टप्पा पूर्ण केला आहे. राज्याच्या बाराही तालुक्यांत मंचच्या बैठका घेण्यात आल्या व १९ प्रभाग समित्या स्थापन करण्यात आल्या. या बैठकांमध्ये एकूण ११२७ कार्यकर्त्यांनी भाग घेतला, असे भेंब्रे, वेलिंगकर आदींनी सांगितले.
(पान २ वर)

Web Title: Show English by granting subsidy bill!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.