विवाहबाह्य संबंधातून युवकावर गोळीबार, तिघांना अटक
By वासुदेव.पागी | Updated: March 9, 2024 13:55 IST2024-03-09T13:55:01+5:302024-03-09T13:55:56+5:30
बेतोडा औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या बेतोडा जंक्शनवर शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जाणाऱ्या सचिन कुर्टीकर याच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरला चोवीस तासात पकडण्यास फोंडा पोलिसांना यश आले आहे.

विवाहबाह्य संबंधातून युवकावर गोळीबार, तिघांना अटक
वासुदेव पागी
पणजी: बेतोडा येथे शुक्रवारी झालेल्या शूटिंग प्रकरणात फोंडा पोलिसांनी २४ तपास लावताना शुटरला अटक करण्यास यश मिळविले आहे.शूटरचे नाव देविदास मसूरकर असे असून तो सचीनच्या वाड्यावरीलच आहे. हा हल्ला विवाहबाह्य संबंधातून झाल्याचे तपासातून आढळून आले आहे. या प्रकरणात देविदास सह एकूण तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.
बेतोडा औद्योगिक वसाहतीजवळ असलेल्या बेतोडा जंक्शनवर शुक्रवारी सकाळी दुचाकीवरून जाणाऱ्या सचिन कुर्टीकर याच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरला चोवीस तासात पकडण्यास फोंडा पोलिसांना यश आले आहे. संशयताचे नाव देविदास मसूरकर असे असून रात्री शुक्रवारी रात्री त्याला अटक करण्यात आली. या प्रकरणात आणखी अटका होण्याची शक्यता असल्याची माहिती दक्षीण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत यांनी दिली.
ज्याच्यावर हल्ला झाला तो सचिन कुर्टीकर हा अविवाहीत आहे आणि संशयित शूटर देविदास मसूरकर हा विवाहीत आहे. दोघेही एकाच वाड्यावरील आहेत. या हल्ल्यात सामील असल्याच्या संशयावरून फोंडा पोलिसांनी प्रवीणकुमार पासवा आणि प्रभात पासवान यांनाही अटक करण्यात आली आहे. ते दोघेही बेतोडा येथीलच आहेत. सचिन कुर्टीकर बेतोडा जंक्शनवर सचिन पोहोचला असता त्याच्या पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या एका अज्ञात व्यक्तीने त्याच्यावर गोळीबार केला होता. गोळी त्याच्या खांद्याला लागून तो जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी गोवा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.