शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसकडून अचानक 'जय मराठी'चा नारा; सरकार स्थापन होताच...; जयराम रमेश यांचं वचन
2
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
3
'अडवाणी, मुरली मनोहर जोशींप्रमाणे नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षानंतर राजकारणातून निवृत्त करणार का? काँग्रेसचा सवाल
4
'4 जूनपूर्वी खरेदी करा, दमदार वाढ होणार...', शेअर बाजाराबाबत अमित शाहंची भविष्यवाणी
5
शाहीन आफ्रिदी आणि अफगाणिस्तानच्या चाहत्यामध्ये बाचाबाची, नेमकं काय घडलं? Video
6
Arvind Kejriwal : "कधी कधी अपमानित करायचे..."; अरविंद केजरीवालांनी सांगितली जेलमधील आपबीती
7
RCB च्या विजयाने Play Off चे गणित किचकट झाले! ३ स्थानासाठी ७ संघ मैदानात उरले
8
मराठी मालिकेच्या सेटवर बिबट्याची एन्ट्री, ४०० भाग पूर्ण झाल्यानिमित्त होतं सेलिब्रेशन
9
'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   
10
Virat Kohli-अनुष्का शर्माची २.५ कोटींच्या गुंतवणूकीचे झाले ९ कोटी; आता कंपनीचा येणार IPO, गुंतवणूक करणार का?
11
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
12
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
13
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
14
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
15
१८ व्या वर्षी दृष्टी गेली, आईच्या मदतीनं पेपर लिहिलं; संघर्षातून युवक बनला IAS
16
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
17
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
18
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
19
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
20
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स

धक्कादायक! गोव्यात चार बिबटे प्राणी संग्रहालयातील पिंजऱ्यातून सुटल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2018 10:08 PM

बोंडला अभयारण्यात पहाटेच्यावेळी घुसून अज्ञातांनी पिंजऱ्यांचे दार उघडून चार बिबटयांना मोकळे सोडल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देबोंडला अभयारण्य हे फोंडा तालुक्याच्या सीमेवर आठ चौरस किलोमीटर क्षेत्रत वसलेले आहे.अभयारण्यात कुणी तरी प्रवेश करून तेथील जनावरांशी खेळ मांडण्याची घटना कधीच घडली नव्हती.

पणजी - बोंडला अभयारण्यात पहाटेच्यावेळी घुसून अज्ञातांनी पिंज-याचे दार उघडून चार बिबटयांना मोकळे सोडल्याची घटना घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. अभयारण्याबाबत असा अनुभव प्रथमच आल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. चारपैकी तिघा बिबटयांना शोधून परत आणण्यात वन अधिकाऱ्यांना यश आले. बिबटयाचा एक बछडा मात्र सापडलेला नाही.

बोंडला अभयारण्य हे फोंडा तालुक्याच्या सीमेवर आठ चौरस किलोमीटर क्षेत्रत वसलेले आहे. रोज बरेच पर्यटक आणि गोमंतकीयही या अभयारण्याला भेट देतात. अभयारण्यात विविध विद्यालयांच्या सहलीही सुरू असतात. अभयारण्यात कुणी तरी प्रवेश करून तेथील जनावरांशी खेळ मांडण्याची घटना कधीच घडली नव्हती. शनिवारी मात्र अशी घटना उघडकीस आली.

शनिवारी पहाटेच्या सुमारास कुणी तरी अज्ञात आत आले व त्यांनी दरावाजा तोडला. पिंजऱ्याचे दार उघडे करून त्यांनी चार बिबटयांना सोडून दिले. रात्रीच्यावेळी ज्या पिंजऱ्यात चारही बिबटयांना ठेवले गेले होते, तो दरवाजा उघडा असल्याचे व बछडयासह उर्वरित तीन बिबटे गायब असल्याचे बंदोबस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सकाळी सहा वाजता आढळून आले. यामुळे खळबळ उडाली व धावाधाव सुरू झाली. 

मंडू आणि अंजली ह्या दोन बिबटयांना लगेच शोधून काढले गेले. बोंडला अभयारण्याच्या परिसरातच ती सापडली. त्यांना सुरक्षितपणे पुन्हा पिंजऱ्यात आणण्यात आले. सायंकाळी ज्युली नावाची बिबटयाची मादी शोधून काढण्यात यश आले. बिबटयाच्या बछडयाचा बराच शोध घेतला गेला. तो अभयारण्यातच फिरताना उशिरा दिसून आला. त्याला रात्रीच्यावेळी पिंजऱ्यात आणण्यात आले. 

बोंडला अभयारण्यात नेमके कोण घुसले होते व दरवाजा तोडून बिबटयांना मोकळे सोडण्यामागे संबंधितांचा कोणता हेतू होता हे कुणालाच अजून कळालेले नाही. मात्र वन खाते आणि पोलिसही या प्रकरणी चौकशी करत आहेत. पोलिस अधिकाऱ्यांनीही बोंडला अभयारण्याला भेट दिली. लोकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने शनिवारी दिवसभर बोंडला अभयारण्य बंद ठेवण्यात आले. लोकांना व पर्यटकांना आत घेण्यात आले नाही. आज रविवारपासून मात्र अभयारण्य खुले राहील, असे संबंधितांनी कळवले आहे. फोंडा पोलिस स्थानकात याविषयी तक्रारही देण्यात आली आहे. 

टॅग्स :goaगोवा