गोवा विद्यापीठाला ‘नॅक’कडून शॉक
By Admin | Updated: July 16, 2014 01:24 IST2014-07-16T01:24:01+5:302014-07-16T01:24:15+5:30
वासुदेव पागी ल्ल पणजी गोवा विद्यापीठाचा समाजशास्त्र व भाषा विभागाचा दर्जा खालावला असल्याचे राष्ट्रीय अधिमान्यता मंडळाच्या (नॅक) पाहणी पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे.

गोवा विद्यापीठाला ‘नॅक’कडून शॉक
वासुदेव पागी ल्ल पणजी
गोवा विद्यापीठाचा समाजशास्त्र व भाषा विभागाचा दर्जा खालावला असल्याचे राष्ट्रीय अधिमान्यता मंडळाच्या (नॅक) पाहणी पथकाने आपल्या अहवालात म्हटले आहे. मात्र, विज्ञान विभागाच्या कामगिरीचे अहवालात कौतुक करण्यात आले आहे.
‘नॅक’च्या पाहणी पथकाने दि. ७, ८ आणि ९ जुलै असे तीन दिवस विद्यापीठाची पाहणी केली होती. या पाहणीनंतर त्यांनी मंडळाला अहवाल सादर केला आहे. तसेच विद्यापीठाला दिलेल्या अहवालात महत्त्वाच्या त्रुटी दाखविण्यात आल्या आहेत. त्यात विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागाच्या दर्जाच्या मुद्द्यावरून ताशेरे ओढले आहेत. या विभागाच्या संशोधन कामाच्या बाबतीत ‘नॅक’ असमाधानी आहे. संशोधनात्मक प्रकल्प, विद्यार्थी व शिक्षकवर्गाकडून त्यासाठी देण्यात आलेले योगदानही समाधानकारक नसल्याचे अहवालात म्हटले आहे. दर्जात्मक सुधारणा घडवून आणण्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
विद्यापीठाच्या विज्ञान विभागाबद्दल मात्र ‘नॅक’ पथकाने आपल्या अहवालात समाधान
व्यक्त केले आहे. साधनसुविधा, शिक्षकवर्ग व संशोधनात्मक
काम उत्कृष्ट दर्जाचे असल्याचे अहवालात म्हटले आहे. विज्ञान विभागात सर्वांत अधिक
अभ्यासक्रम असून सूक्ष्म जीवशास्त्र, मरिन सायन्स, रसायनशास्त्र, जीवशास्त्र या विभागांत विद्यार्थ्यांचा प्रचंड ओघ असतो.