शेखर साळकर ‘बॅकफूट’वर

By Admin | Updated: June 18, 2015 01:50 IST2015-06-18T01:50:33+5:302015-06-18T01:50:43+5:30

पर्वरी : येत्या २८ जून रोजी होणाऱ्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा ‘डाव’ बुधवारी (दि.१७) चांगलाच रंगला. निवडणुकीसाठी ४०

Shekhar Salkar on 'Backfoot' | शेखर साळकर ‘बॅकफूट’वर

शेखर साळकर ‘बॅकफूट’वर

पर्वरी : येत्या २८ जून रोजी होणाऱ्या गोवा क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीचा ‘डाव’ बुधवारी (दि.१७) चांगलाच रंगला. निवडणुकीसाठी ४० क्लबना अपात्र ठरवणे डॉ. शेखर साळकर यांना चांगलेच महागडे ठरले. अखेर पेटून उठलेल्या सदस्य क्लबनी जीसीएचे हंगामी अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांना घेराओ घातला आणि त्यानंतर ‘बॅकफूट’वर आलेल्या डॉ. साळकरांनी सर्व क्लब पात्र ठरणार, असे आश्वासन लेखी स्वरूपात दिले. या महानाट्यावर सध्या पडदा पडला असला तरी निवडणुकीचा ‘डाव’ आणखी रंगण्याची चिन्हे आहेत. (पान २ वर)

Web Title: Shekhar Salkar on 'Backfoot'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.