शशिकला काकोडकर इस्पितळात
By Admin | Updated: March 25, 2015 01:40 IST2015-03-25T01:34:40+5:302015-03-25T01:40:08+5:30
पणजी : माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा संशय असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.

शशिकला काकोडकर इस्पितळात
पणजी : माजी मुख्यमंत्री शशिकला काकोडकर यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा संशय असून त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
काकोडकर आल्तिनो येथे राहतात. त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा संशय आहे. त्यांना त्रास जाणवू लागल्याने आठ दिवसांपूर्वी एका खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी तीन दिवसांपूर्वीच त्यांची भेट घेतली व विचारपूस केली. त्या वेळी त्यांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा कुणालाही संशय नव्हता. आता काकोडकर यांची स्थिती सुधारत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आरोग्य खाते सांभाळणारे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, काकोडकर यांना अगोदर स्वाईन फ्लूची लागण झाल्याचा अहवाल आला होता. त्यानंतर दुसऱ्यांदा त्यांची चाचणी
केली असता, त्यात स्वाईन फ्लू आढळला नाही. तथापि, त्यांच्यावर योग्य ते उपचार दोनापावल येथील एका इस्पितळात सुरू आहेत.
(खास प्रतिनिधी)