‘शॅडो मुख्यमंत्री म्हणून
By Admin | Updated: December 15, 2014 01:23 IST2014-12-15T01:14:57+5:302014-12-15T01:23:35+5:30
----

‘शॅडो मुख्यमंत्री म्हणून
पणजी : केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून गेलेले मनोहर पर्रीकर यांनी आता आपल्या नव्या जबाबदारीकडे लक्ष केंद्रित करावे. गोव्याचे शॅडो मुख्यमंत्री म्हणून वावरू नये, असा सल्ला काँग्रेसचे गोवा प्रभारी दिग्विजय सिंग यांनी दिला आहे.
संरक्षणमंत्रिपद हे संवेदनशील खाते आहे. तेथे अधिक जबाबदारीने काम केले पाहिजे, असे ते म्हणाले. पर्रीकर वरचेवर गोव्यात येतात यावरून त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांना केंद्रात नेल्याचे स्पष्ट होते. आठवड्यातील काही दिवस पर्रीकर गोव्यातच असतात, त्यामुळे याआधी त्यांच्यावर विरोधी पक्षाकडून तसेच सोशल मीडियावरून टीकाही झालेली आहे.
मोदी सरकारने देशाचा विकास दर वाढवू, असे आश्वासन दिले होते. तो खाली आलेला आहे, अशी टीका दिग्विजय सिंग यांनी केली. पंतप्रधान मोदी कोणतेच आश्वासन पाळू शकलेले नाहीत. काळा पैसा १00 दिवसांच्या आत देशात परत आणीन, अशी भीष्मप्रतिज्ञा मोदी यांनी केली होती. अद्याप काहीच झालेले नाही. उलट अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. ते पुढे म्हणाले की, राज्यात २0१२च्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव पत्करावा लागलेल्या काँग्रेसने आता पुढील वाटचालीसाठी रोड मॅप तयार करण्याचे काम हाती घेतले आहे. लुईझिननी प्रदेशाध्यक्षपद हाती घेतलेले आहे. विरोधी पक्षनेते व लुईझिन दोघेही अनुभवी नेते आहेत. (प्रतिनिधी)