पर्वरीत स्पामधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
By Admin | Updated: June 14, 2015 01:54 IST2015-06-14T01:54:21+5:302015-06-14T01:54:21+5:30
पणजी : पर्वरी येथील आर. जे. स्पा अॅण्ड मसाज पार्लरवर सीआयडीकडून छापा टाकून १० दलालांना अटक केली. या छाप्यातून ८ युवतींची सुटका करण्यात आली.

पर्वरीत स्पामधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
पणजी : पर्वरी येथील आर. जे. स्पा अॅण्ड मसाज पार्लरवर सीआयडीकडून छापा टाकून १० दलालांना अटक केली. या छाप्यातून ८ युवतींची सुटका करण्यात आली.
अटक करण्यात आलेल्यांची नावे थॉमस के., विशाल राय, लालमुनपिया विजयशंकर बिजू, शंभुरान राणा, अभिषेक एस. आर, प्रशांत गंगेपुत्रा, असिफ खुर्से, अरविंद तिवारी, बिरेंद्र सिंग आणि गरिन आरसेने अशी आहेत. यापैकी गरिन आरसेने हा फ्रेंच नागरिक आहे. या स्पाचे मालक पणजी येथील रायन गुदिन्हो आहेत. अटक करण्यात आलेल्यांत स्पाच्या व्यवस्थापकाचाही समावेश आहे.
मसाजच्या नावाखाली पुन्हा एकदा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश झाला असून गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून अर्ज या बिगर सरकारी संस्थेच्या मदतीने हा छापा टाकण्यात आला. पोलिसांनी पाठविलेल्या बोगस गिऱ्हाईकाला पार्लरमधील कर्मचारी ओळखू शकले नाहीत. त्यामुळे हे सेक्स रॅकेट उघडकीस आले.