शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

कळंगुट किनारी भागातील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 21:26 IST

कळंगुट किनारी भागातील एका तारांकित हॉटेलात सुरु असलेल्या उच्चभ्रू सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना अटक केली असून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन युवतींची सुटका केली आहे.

म्हापसा -  कळंगुट किनारी भागातील एका तारांकित हॉटेलात सुरु असलेल्या उच्चभ्रू  सेक्स रॅकेटचा पर्दाफाश पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी सात संशयितांना अटक केली असून वेश्या व्यवसायात गुंतलेल्या दोन युवतींची सुटका केली आहे.सदर कारवाई बुधवारी रात्री करण्यात आली. कळंगुट येथे दोन युवतींना ग्राहकांसाठी पुरवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी या प्रकरणी बिगर सरकारी संस्थाच्या कार्यकर्त्यांसमवेत त्यांना पकडण्यासाठी सापळा रचला. एका गाडीने दोन युवतींना घेऊन तिघे जण येथील एक तारांकित हॉटेल कासा रॉय अ‍ॅन हॉटेलमध्ये शिरले. सोबत आणलेल्या युवतींना हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या खोलीतील ग्राकहांना पुरवून ते तिघेही त्या हॉटेलमधून बाहेर पडले. त्याच दरम्यान तेथे असलेल्या पोलिसांनी त्या तिघानांही अटक केली.ताब्यात घेण्यात आलेल्या तिघांची अधिक खोलवर चौैकशी पोलिसांनी केली असता त्यांनी त्या हॉटेलात केरळ राज्यातून आलेल्या ग्राहकांना मुंबई व महाराष्ट्रातील दोन मुली पुरवल्याची माहिती दिली. लागलीच पोलिसांनी त्या हॉटेलावर छापा टाकून त्या मुलींची सुटका केली व चौघांना ताब्यात घेतले. या प्रकरणी केरळमधील चार ग्राहकांसमवेत मुलींचा पुरवठा करणारे ओडिसा, नेपाळ व केरळतील तिघांना मिळून सात जणांना ताब्यात घेतले. सुटका केलेल्या त्या दोन युवतींना नंतर न्यायदंडाधिकाºयासमोर हजर व नंतर त्यांची रवानगी पणजी जवळ असलेल्या मेरशी येथील अपना घरात करण्यात आली.संबंधीत हॉटेलातील ज्या मजल्यावर हा प्रकार घडला त्या हॉटेलचा पहिला मजला पोलिसांनी नंतर सील केला. तसेच कळंगुट पंचायत व पर्यटन खात्याला पत्र पाठवून त्यांना देण्यात आलेले परवाने रद्द करण्यात यावे अशी मागणी केली आहे. सदर हॉटेलात आलेल्या पाहुण्यांची हॉटेलच्या नोंदवहीत नोंद करण्यात आली नसल्याचे केलेल्या चौकशी दरम्यान पोलिसांना आढळून आले आहे.या प्रकरणात पोलिसांनी त्या पिडीत युवतींना हॉटेलात सोडण्यासाठी वापरलेली एक गाडी तसेच त्या ग्राहकांकडून घेतलेले ७० हजार रुपये नकद व नऊ मोबाईल फोन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. युवतींचा पुरवठा करणाºया एकाला यापूर्वी अशाच प्रकरणात तीनवेळा अटक करुन नंतर सुटका करण्यात आली होती. या प्रकरणी सर्व संशयीता विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून अधीक्षक चंदन चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जिवबा दळवी यांनी या उच्चभू्र सेक्स प्रकरणाचा छडा लावला असून उपनिरीक्षक सीताराम मळीक पुढील तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिस