सेसा कंपनीला फटका

By Admin | Updated: April 9, 2015 01:26 IST2015-04-09T01:21:47+5:302015-04-09T01:26:02+5:30

पणजी : राज्यातील खनिज मालाचा ई-लिलाव हा खाण खात्याने नियमितपणे सुरू ठेवायला हवा. खनिज मालाच्या स्थानिक वापरासाठी

Sesa Company Shot | सेसा कंपनीला फटका

सेसा कंपनीला फटका

पणजी : राज्यातील खनिज मालाचा ई-लिलाव हा खाण खात्याने नियमितपणे सुरू ठेवायला हवा. खनिज मालाच्या स्थानिक वापरासाठी खनिजाचा ई-लिलाव सातत्याने होणे गरजेचे आहे, अशी विनंती करणारे पत्र सेसा स्टरलाईट कंपनीने सरकारच्या खाण खात्यास लिहिले आहे. ई-लिलावाद्वारे खनिज माल मिळाला नाही तर सेसाचा वीज निर्मिती प्रकल्पही बंद होईल, अशी भीती सेसा स्टरलाईट कंपनीने व्यक्त केली आहे, अशी माहिती सरकारच्या सूत्रांकडून मिळाली.
डिचोली तालुक्यातील आमोणा व न्हावेली येथे सेसाचे प्रकल्प आहेत. पीग आयर्न व मेटलर्जीकल कोकचे तिथे उत्पादन केले जाते. शिवाय एक वीज निर्मिती प्रकल्पही चालतो. एका पीग आयर्न प्रकल्पासाठी गेल्या वर्षी सेसाने ७.७ लाख टन खनिजाची खरेदी केली होती. सरकारने केलेल्या ई-लिलावाद्वारे सेसाने हे खनिज प्राप्त केले होते.
रोज सेसाच्या प्रकल्पांसाठी ३ हजार १०० मेट्रीक टन फाईन्स व १ हजार मेट्रीक टन लम्प्सची गरज असते. गेले काही महिने खाण खात्याने ई-लिलावच पुकारला नाही. त्यामुळे सेसाच्या विविध उद्योगांना कच्चा माल कमी पडण्याची स्थिती निर्माण झाली आहे, असे पत्रात म्हटले आहे.
या वर्षी एप्रिलच्या मध्यापर्यंत पुरेल एवढी फाईन्स व जूनच्या मध्यापर्यंत पुरेल एवढे लम्प्स आपल्याकडे शिल्लक आहे. खाण खात्याने जर आम्हाला कच्चा माल पुरविला नाही तर आमचा प्रकल्प बंद करावा लागेल, असे सेसा स्टरलाईट कंपनीने पत्रात म्हटले असल्याची माहिती सरकारच्या सूत्रांकडून मिळाली.
सेसाच्या वीज निर्मिती प्रकल्पाकडून कमी दराने सरकारला वीज पुरविली जाते. स्थानिक लम्प्सचा पुरवठा होत नसल्याने सेसाचे ब्लास्ट फर्नेसीस, कोक व वीज प्रकल्पही बंद होतील, असे सेसा स्टरलाईट कंपनीने पत्रात नमूद केले आहे.
कर्नाटकमधील उद्योग जगावेत म्हणून तेथील खाण खाते नियमितपणे लिलाव पुकारते. गोव्यातही खनिज मालाचा नियमितपणे लिलाव केला जावा, अशी सेसा स्टरलाईटची अपेक्षा आहे. पीग आयर्न विभागाचे सहयोगी उपाध्यक्ष एन. एल. व्हाट्टे यांची या पत्रावर सही आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Sesa Company Shot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.