सतीश धोंड यांची गोव्याबाहेर रवानगी

By Admin | Updated: July 5, 2015 01:39 IST2015-07-05T01:39:14+5:302015-07-05T01:39:25+5:30

पणजी : सतीश धोंड यांनी अखेर गोव्यातील भाजप संघटनेचे संघटनमंत्री हे महत्त्वाचे पद गमावले आहे. त्यांची गोव्याहून कोकण-ठाणे भागासाठी नियुक्ती झाली आहे.

Send Satish Dhond out of Goa | सतीश धोंड यांची गोव्याबाहेर रवानगी

सतीश धोंड यांची गोव्याबाहेर रवानगी

पणजी : सतीश धोंड यांनी अखेर गोव्यातील भाजप संघटनेचे संघटनमंत्री हे महत्त्वाचे पद गमावले आहे. त्यांची गोव्याहून कोकण-ठाणे भागासाठी नियुक्ती झाली आहे. गोवा भाजपमधील धोंडविरोधक, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक तसेच सभापती राजेंद्र आर्लेकर यांचे अनेक समर्थक व राज्यभरातील संघ स्वयंसेवकांमध्येही त्यामुळे समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
धोंड यांच्याविषयी ज्या ज्या वेळी तक्रारी आल्या, त्या त्या वेळी त्यांची बदली करण्याची भूमिका पक्षश्रेष्ठींनी घेतली. यापूर्वी त्यांची रवानगी दमण-दीवमध्ये करण्यात आली होती. २०१२ साली मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री बनल्यानंतर धोंड यांचा नोकर भरती प्रक्रियेत व एकूणच शासकीय कामात जास्त हस्तक्षेप होत असल्याच्या तक्रारी पदाधिकाऱ्यांकडून येऊ लागल्या. काही आमदारही धोंड यांच्याविषयी खूप नाराज होते. राज्यात भाजपजवळ सत्ता असूनदेखील जिल्हा पंचायत निवडणुकीवेळी भाजपच्या वाट्याला जी नामुष्की आली, त्यासही धोंड यांची कार्यपद्धती बरीच जबाबदार ठरली होती. डिचोली तालुक्यात भाजपच्या एका महिला उमेदवाराचा पराभव झाला. त्या अनुषंगानेही धोंड यांच्या प्रतिमेविषयी बरीच चर्चा झाली. मुख्यमंत्री पार्सेकर हेही धोंड यांच्याविषयी तेव्हा नाराज झाले होते.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Send Satish Dhond out of Goa