सिगारेट विकणार? प्रतिदिनी द्या २०० रुपये दंड!
By Admin | Updated: April 10, 2015 01:55 IST2015-04-10T01:54:54+5:302015-04-10T01:55:10+5:30
मडगाव : संपूर्ण दक्षिण गोवा तंबाखूमुक्त बनविण्याच्या सरकारी निर्णयाचा जबरदस्त फटका मडगाव शहरातील गाडेवाल्यांना बसला आहे.

सिगारेट विकणार? प्रतिदिनी द्या २०० रुपये दंड!
मडगाव : संपूर्ण दक्षिण गोवा तंबाखूमुक्त बनविण्याच्या सरकारी निर्णयाचा जबरदस्त फटका मडगाव शहरातील गाडेवाल्यांना बसला आहे. या गाड्यांना पोलीस प्रतिदिनी २०० रुपये दंड ठोठावत असल्याने हे छोटे व्यावसायिक हवालदिल बनले आहेत.
अनेक गाडेवाले परंपरागतरीत्या सिगारेट विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायावरच या निर्णयाने गदा येणार असल्याचे गाडा ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितले व निर्णय मागे न घेतल्यास गाडेवाले कुटुंबासह उपोषणादी आंदोलन सुरू करतील, असा इशारा दिला.
जरी दक्षिण गोवा तंबाखूमुक्त बनविण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी अग्रवाल हे जिल्हाधिकारी असताना घेतला जात असला, तरी त्याची कार्यवाही धिम्यागतीनेच चालू होती; परंतु गेल्या आठवड्यापासून अचानक मडगाव पोलिसांनी त्याची काटेकोर कार्यवाही सुरू करून प्रतिदिनी २०० रुपये दंड दिल्याने गाडेवाल्यांना ते खुले ठेवणेच मुश्किल बनले आहे. नाईक म्हणाले की, मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना आम्ही या प्रकाराची कल्पना दिली असून ते आमच्या मागे आहेत.
दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक एस. एम. प्रभुदेसाई यांना विचारता ते म्हणाले, कायद्यान्वये आम्हाला कारवाई करणे भागच आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी तज्ज्ञ व नागरिकांची एक समितीही असून त्यात डॉक्टरही आहेत. त्यांनी सूचना दिली तर पोलिसांना त्यांच्याबरोबर जाऊन सिगारेट विकणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावीच लागते. ‘दंड लागू करणे ही त्यातील केवळ एकच तरतूद आहे. शिवाय इतरही बरेच कडक उपाय असून पोलीस त्यांचा सध्या अभ्यास करीत असल्याची’ माहिती त्यांनी दिली.
(विशेष प्रतिनिधी)सिगारेट विकणार? प्रतिदिनी द्या २०० रुपये दंड!

(विशेष प्रतिनिधी)