शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

गोव्यात धोक्याचा इशारा! कोविडची दुसरी लाट डिसेंबरमध्ये शक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2020 18:17 IST

Corona virus News: राज्यात सध्या दिवसाला फक्त दोनशे किंवा सव्वा दोनशे कोविड बाधित आढळतात. रोज सरासरी १७०० कोविड चाचण्या होतात.

पणजी : राज्यात कोविड आता खूपच नियंत्रणात असला तरी, गाफील राहून चालणार नाही. कारण कोविडची दुसरी लाट येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यात गोव्यात येऊ शकते, असा इशारा आरोग्य मंत्री विश्वजित राणे यांनी शनिवारी येथे दिला.

राज्यात सध्या दिवसाला फक्त दोनशे किंवा सव्वा दोनशे कोविड बाधित आढळतात. रोज सरासरी १७०० कोविड चाचण्या होतात. कोविड मृत्यूंची संख्याही ओक्टोबरमध्ये कमी झाली. सप्टेंबरच्या तुलनेत ओक्टोबरमध्ये कोविडमुळे कमी रुग्ण दगावले. लोकांमध्ये पुन्हा शिथिलता येऊ लागली आहे.या पार्श्वभूमीवर बोलताना मंत्री राणे म्हणाले, की दिल्लीत देखील कोविड नियंत्रणात आला होता पण आता नव्याने तिथे मोठ्या संख्येने रुग्ण आढळणे सुरू झाले आहे. युरोपमध्येही कोविडची दुसरी लाट सुरू झाली. गोव्यात देखील नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये दुसरी लाट येऊ शकते. त्यामुळेच आम्ही कोविडविषयक कोणत्याच सुविधा बंद करणार नाही. त्या सुरूच ठेवणार आहोत.

राणे म्हणाले, की लोकांनी काळजी घ्यायलाच हवी. त्या शिवाय पर्याय नाही. यापुढे मोठ्या प्रमाणात राज्यात आर्थिक उपक्रम सुरू होतील किंवा सगळे व्यवसाय सुरू होतील तेव्हा कोविड रुग्ण संख्या वाढू शकते. चाचण्या वाढविण्याची सूचना आपण यापूर्वीच आरोग्य खात्याच्या अधिकाऱ््यांना केली व त्यांनी चाचण्या वाढवल्या आहेत. 

राणे म्हणाले, की कोविड नियंत्रणात आल्याने आता फोंडा येथील कोविड इस्पितळाची गरज नाही असा सल्ला मला काही अधिकारी देतात. मात्र मला ते मान्य नाही. फोंडासह सर्व रही कोविड इस्पितळे सुरू राहतील. फोंड्याचे इस्पितळ आम्ही कोविडमध्ये रुपांतरित केले आहे, ते तसेच राहिल. मला अधिकाऱ््यांनी सांगण्याची गरज नाही. मी काही अशिक्षित मंत्री नव्हे.आणखी दोघांचा मृत्यू दरम्यान, कोविडमुळे शनिवारी आणखी दोघांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची एकूण संख्या ६०४ झाली आहे. शनिवारचे दोन्ही मृत्यू बांबोळीच्या गोमेको इस्पितळात झाले. फोंडा येथील ४६ वर्षीय महिलेचा मृत्यू शस्त्रक्रिया विभागातच झाला, कारण तिला दुसरा एक गंभीर आजार झाला होता. योगायोगाने तिला कोविडचीही लागण झाली, असे गोमेकोच्या डीनचे म्हणणे आहे. दोडामार्ग येथील ७५ वर्षीय कोविड रुग्णाचे गोमेकोत निधन झाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक