पावसाची सत्तरीत वक्रदृष्टी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2016 02:14 IST2016-07-05T02:14:52+5:302016-07-05T02:14:52+5:30
पणजी : राज्यभर मान्सूनने जोरदार पाऊस दिलेला असला तरी सत्तरीच्या खात्यात कमीच पाऊस पाडला. राज्यात सरासरी

पावसाची सत्तरीत वक्रदृष्टी
पणजी : राज्यभर मान्सूनने जोरदार पाऊस दिलेला असला तरी सत्तरीच्या खात्यात कमीच पाऊस पाडला. राज्यात सरासरी पावसाने इंचांचे शतक ओलांडले असले तरी हवामान खात्याच्या वाळपई येथील केंद्रावर आतापर्यंत एकूण केवळ ३७ इंच पावसाचीच नोंद झाली आहे.
जून महिन्यात पडलेल्या जोरदार पावसामुळे राज्यातील बहुतेक भागांत ५० इंचांहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. मुरगावात सर्वाधिक ६५ इंच, पेडणेत ६३ इंच, दाबोळी व साखळीत ५८ इंच तर केपेत व काणकोणमध्ये ५६ इंच पावसाची नोंद झाली आहे. केवळ म्हापसा, जुने गोवे येथे इंचांची पन्नाशी गाठण्यासाठी अजून थोडासा पाऊस लागेल. वाळपईत मात्र ३७ इंच पावसाची नोंद झाली आहे. मान्सून गोव्यात येऊन धडकला तो सुरुवातीला किनारपट्टी भागातच बरसला. त्यामुळे मुरगाव, दाबोळी, काणकोण आणि पेडणे या भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला. आता यापुढे पडणाऱ्या पावसाकडून सांगे, वाळपई व फोंड्यातील लोक अपेक्षा बाळगून आहेत. (प्रतिनिधी)