शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

गोव्यात नव्या मुख्यमंत्र्यांचा शोध, मनोहर पर्रीकरांची प्रकृती स्थिर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 20:37 IST

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे पण पर्रीकर यांचा आजार गंभीर असल्याने भाजपमधून व सत्ताधारी आघाडीतूनही पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झालेला आहे.

पणजी  - मुख्यमंत्री मनोहर  पर्रीकर यांची प्रकृती आता स्थिर आहे पण  पर्रीकर यांचा आजार गंभीर असल्याने भाजपमधून व सत्ताधारी आघाडीतूनही पर्यायी नेतृत्वाचा शोध सुरू झालेला आहे. गोव्याचे प्रशासन सक्रिय होण्यासाठी नव्या मुख्यमंत्र्यांची तातडीने गरज आहे याची कल्पना गोवा फॉरवर्ड व मगोप या घटक पक्षांनाही आलेली आहे. सरकारमधील तीन मंत्री येत्या 17 किंवा 18 रोजी दिल्लीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना भेटून राजकीय स्थिती त्यांच्यासमोर ठेवणार आहे.

मुख्यमंत्री मनोहर  पर्रीकर  हे दोनापावला येथील आपल्या निवासस्थानी आहेत. तिथे चोवीस तास ते डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहेत. सरकारमधील घटक पक्ष सध्या पर्यायी मुख्यमंत्री कोण याविषयी चर्चा करू लागले आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपचे आमदार असलेले आरोग्य मंत्री विश्वजित राणे हे पुढे आहेत. मात्र मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर यांची त्यांना अजून मान्यता लाभलेली नाही. गोवा फॉरवर्डचे नेते असलेले मंत्री विजय सरदेसाई यांचा तूर्त तरी मंत्री राणे यांना पाठींबा असल्याची माहिती मिळते. भाजपच्या सर्व आमदारांची सोमवारी पक्षाच्या पणजीतील मुख्यालयात बैठक झाली. त्यावेळीही राज्यातील राजकीय स्थितीविषयी चर्चा झाली.

पर्रिकर हे दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेत होते. तिथे त्यांनी उपचार पूर्ण केले नाहीत. रविवारी  पर्रीकर  गोव्यात दाखल झाले. रविवारी त्यांची प्रकृती नाजूक बनली होती. त्यामुळे भाजपच्या सर्व आमदार व मंत्र्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती.  पर्रीकर हे गोव्यात आल्यानंतर कुठल्याच मंत्री किंवा आमदाराला भेटू शकलेले नाहीत. पर्रीकर  हे दोनापावला येथील त्यांच्या निवासस्थानी कुटुंबियांसोबत आहेत.

त्यांच्या निवासस्थानीही भाजपमधील कुणीच मंत्री किंवा आमदार जाऊ शकले नाहीत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर व सरचिटणीस सदानंद शेट तानावडे हे दोघे मात्र सोमवारी सकाळी मुख्यमंत्र्यांना भेटले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती थोडी सुधारली असल्याचे त्यांना दिसून आले. तथापि, पर्रिकर यांच्या निवासस्थानी कायम सरकारी डॉक्टर्स ठेवण्यात आले आहेत. 1०8 रुग्णवाहिकाही त्यांच्या निवासस्थानाबाहेर ठेवली गेली आहे.

दरम्यान, विद्यमान विधानसभेत काँग्रेसकडे सोळा आमदार आहेत. काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष असल्याने त्या पक्षाचे दोन आमदार फोडावेत असा प्रयत्न भाजपमधून सुरू झालेला आहे. सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे या दोघा आमदारांना भाजपने गळ टाकलेला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला निवेदन सादर केले असून, काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी न देता गोवा विधानसभा विसर्जित केली जाऊ नये अशी मागणी काँग्रेसने निवेदनातून केली आहे. 

टॅग्स :Manohar Parrikarमनोहर पर्रीकरgoaगोवा