स्मार्ट सिटीच्या नावाखाली घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2015 01:38 IST2015-11-10T01:38:14+5:302015-11-10T01:38:25+5:30

पणजी : शहरात स्मार्ट सिटीच्या नावावर स्मार्ट पद्धतीने स्मार्ट लोकांकडून स्मार्टपणे घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप जनरेशन नेक्स्ट संघटनेने सोमवारी

Scam in the name of smart city | स्मार्ट सिटीच्या नावाखाली घोटाळा

स्मार्ट सिटीच्या नावाखाली घोटाळा

पणजी : शहरात स्मार्ट सिटीच्या नावावर स्मार्ट पद्धतीने स्मार्ट लोकांकडून स्मार्टपणे घोटाळा करण्यात येत असल्याचा आरोप जनरेशन नेक्स्ट संघटनेने सोमवारी
येथे पत्रकार परिषदेत केला. गोवा साधनसुविधा महामंडळाने इमेजिन पणजीसाठी सल्लागारच्या नावाने
२ कोटी ८९ लाख रुपयांचा
घोटाळा केला असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्मार्ट सिटी आणि इमेजिन पणजी हे एकाच नाण्याच्या दोन
बाजू आहेत. गोवा साधनसुविधा महामंडळाने इमेजिन पणजीसाठी सल्लागार कंपनीची नेमणूक केली होती. २२ जुलै २0१४ साली एलकेएस इंडिया प्रा. लि. कंपनीने २ कोटी ८९ लाख रुपये घेऊन गोवा साधनसुविधा महामंडळाला १ हजार ६0 पानांचा अहवाल सादर केला होता. मात्र, अजूनपर्यंत जीएसआयडीसीने या अहवालाबाबत आपली भूमिका
स्पष्ट केली नाही.
कंपनीने सादर केलेला अहवाल जीएसआयडीसीने मंजूरही केला नाही आणि रद्दही केला नाही. यामुळे केवळ पैशांचा घोटाळा करण्यासाठी इमेजिन पणजी संकल्पनेचा वापर करण्यात आला असल्याचे जनरेशन नेक्स्टचे दुर्गादास कामत यांनी सांगितले.
इमेजिन पणजी प्रकल्प सल्लागार नेमण्यासाठी जीएसआयडीसीने पुन्हा नवीन कंपनी नियुक्त केली आहे. या प्रकरणात
मोठा घोटाळा असून नवीन सल्लागार न नेमता पूर्वीचाच अहवाल श्वेतपत्रिकेवर जाहीर करावा, अशी मागणी कामत यांनी केली.
तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी इमेजिन पणजी प्रकल्पासाठी २0 कोटी रुपये राज्य सरकार आणि २0 कोटी रुपये महानगरपालिका देणार असल्याचे जाहीर केले होते. केंद्र सरकारकडून या प्रकल्पासाठी ६0 कोटी रुपयांची मदत मिळणार होती. मात्र, अजूनही या प्रकल्पाला दिशा मिळाली नसून, स्मार्ट सिटी संकल्पना ही स्मार्ट नागरिकांना फसविण्याचे काम करेल यात शंका नाही, असे कामत म्हणाले.
इमेजिन पणजीच्या नावाने चालविलेल्या घोटाळ्याची चौकशी करावी, असे निवेदन केंद्रीय नगरविकास मंत्रालयाला पाठविण्यात येईल, असे कामत यांनी
सांगितले.
(प्रतिनिधी)

Web Title: Scam in the name of smart city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.