“गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू”: संजय राऊत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 12:39 PM2021-09-30T12:39:54+5:302021-09-30T12:43:01+5:30

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत गोवा दौऱ्यावर आहेत.

sanjay raut says shiv sena will do good performance like maharashtra if form govt in goa | “गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू”: संजय राऊत

“गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू”: संजय राऊत

Next
ठळक मुद्देशिवसेना २२ जागांवर निवडणूक लढणारशिवसेना आणि गोव्याचे भावनिक नातेविजय सरदेसाई, वेलिंगकर यांची भेट घेणार

पणजी: पुढील वर्षी अन्य पाच राज्यांप्रमाणे गोव्यातही विधानसभा निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभूमीवर अनेकविध पक्षांनी आतापासूनच मोर्चेबांधणी करायला सुरुवात केली आहे. यातच शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊतगोवा दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशसह गोव्यातही निवडणुका लढवण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. तसेच गोव्यात २२ जागांवर शिवसेना लढणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. याशिवाय गोव्यात शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे कामगिरी करून दाखवू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे. (sanjay raut says shiv sena will do good performance like maharashtra if form govt in goa)

शिवसेना २२ जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही गोव्यातील निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. आम्हाला कोणत्याही युतीची गरज नाही. आमची पक्षबांधणी उत्तम आहे. तर कोलकात्यामधील तृणमूल गोव्यात निवडणूक लढवू शकते, तर गोवा महाराष्ट्राच्या शेजारीच आहे. आम्ही महाराष्ट्रामध्ये कशी कामगिरी केलीय हे तुम्ही पाहू शकता, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. 

शिवसेनेची सत्ता आल्यास महाराष्ट्राप्रमाणे चांगली कामगिरी करून दाखवू

शिवसेना आणि गोव्याचे भावनिक नाते आहे. विजय सरदेसाई, वेलिंगकर यांची भेट घेणार आहे. नवे आणि जुने पक्ष कार्यकर्ते या दौऱ्यात मला भेटणार आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे, आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री तसेच युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे हेदेखील गोव्यात प्रचारासाठी येतील, अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली. गोव्यामधील कोणत्याही पक्षाने आमच्याकडे युतीसंदर्भात विचारणा केलेली नाही, असे राऊत यांनी स्पष्ट केले आहे. 

भाजपला धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे 

संपूर्ण गोव्याला अंमली पदार्थांचा विळखा पडलेला आहे. गोव्यात कॅसिनोचा, जुगाराचा कहर आहे. त्याला विरोध करण्यासाठी आंदोलन करतच भाजप तिकडे सत्तेवर आली. मात्र, त्या सगळ्याला आता भाजपचा पाठिंबा आहे. कोरोनाकाळात गोव्याची अवस्था वाईट झाली आहे. ड्रग्समाफियांच्या ताब्यात गोवा अडकला आहे. भाजप फारच थापा मारत आहे. त्यासाठी तिकडे जाणे गरजेचे आहे. महाराष्ट्र आणि गोव्याची तुलना करता येणार नाही. भाजपने गोव्यात अनेकदा तोडफोड करत सत्ता स्थापन केली आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्याची इच्छा जनतेची आहे आणि ते शिवसेनाच करू शकते, असे संजय राऊत यांनी यापूर्वी म्हटले होते.
 

Web Title: sanjay raut says shiv sena will do good performance like maharashtra if form govt in goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.