समीर सारदानाची सशर्त जामिनावर सुटका

By Admin | Updated: February 12, 2016 03:56 IST2016-02-12T03:56:07+5:302016-02-12T03:56:59+5:30

वास्को : गोव्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने दहशतवादी असल्याच्या संशयावरून अटक करून ताब्यात घेतलेल्या समीर सारदाना (४६ वर्षे)

Sameer Saradana gets bail on conditioned bail | समीर सारदानाची सशर्त जामिनावर सुटका

समीर सारदानाची सशर्त जामिनावर सुटका

वास्को : गोव्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने दहशतवादी असल्याच्या संशयावरून अटक करून ताब्यात घेतलेल्या समीर सारदाना (४६ वर्षे) याला वास्को येथील प्रथमश्रेणी न्यायालयाने ठोस पुरावे सादर न केल्याने त्याची सशर्त जामिनावर सुटका केली़
तसेच समीरला चार दिवस गोव्याबाहेर न जाण्याचे, चार दिवसांत एटीएसमध्ये हजेरी लावण्याचे आदेश न्यायाधीश शबनम शेख यांनी दिले़
वास्को रेल्वे पोलिसांनी आतंकवादी असल्याच्या संशयावरून ताब्यात घेतलेल्या देहरादून येथील समीर सारदाना याला नंतर एटीएसच्या स्वाधीन केले होते. मात्र, एटीएस त्याच्याविरुध्द गेल्या आठ दिवसांत ठोस अशी काहीच माहिती गोळा करू न शकल्याने तसेच त्याच्याजवळ असलेल्या लॅपटॉपमधील माहिती प्राप्त करू न शकल्याने त्याला जामीन मंजूर करण्यात आला. माहिती गोळा करण्यासाठी आणखी काही दिवस लागणार असल्याने एटीएसने न्यायालयीन कोठडी मागितली होती़ या वेळी अ‍ॅड. शशिकांत एऩ जोशी यांनी हरकत घेतली़ जोशी यांनी युक्तिवाद करताना, समीर सारदाना याला सबळ पुराव्याविना नाहक एटीएसने अडकवून ठेवले असल्याचा दावा केला.
सरकारी वकील अ‍ॅड़ देवानंद कोरगावकर यांनी एटीएसची बाजू मांडली़ दरम्यान, दोन्ही बाजंूकडील युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर तसेच सरकारपक्षातर्फे समीर सारदानाच्या बाबतीत ठोस पुरावे सादर करण्यास एटीएस अपयशी ठरल्याने अखेर न्यायाधीश शबनम शेख यांनी आपला निवाडा देताना समीरला सशर्त जामीन मंजूर केला़
या वेळी समीरचे मामा-मामी न्यायालयात उपस्थित होते़ समीरचे मामा निवृत्त कमांडर हरविंदर सिंग रावत यांनी आपल्या भाच्यासाठी जामीन दिला़ माझा कोणत्याही दहशतवादी संघटनेशी संबंध नसल्याचे समिर याने सांगितले़ तसेच न्यायपालिकेवर आपला पूर्ण विश्वास होता व मी मुक्त होणार हे मला माहीत होते, असे तो म्हणाला.
पत्रकारांना तंबी
आज न्यायालयात समीर सारदाना याची सुनावणी अंतिम टप्प्यात असताना न्यायाधीश शबनम शेख यांनासमोर असलेल्या बाकावर एक पत्रकार न्यायालयात होत असलेली वकिलांची बोलणी रेकॉर्ड करत असताना त्यांच्या नजरेस पडले़ त्यांनी त्वरित पोलिसांना त्या पत्रकारासहित इतर समोर बसलेल्या एक मराठी (लोकमत नव्हे) व इंग्रजी दैनिकांच्या पत्रकारांचे मोबाईल जप्त केले़ सुनावणी संपल्यानंतर तंबी देऊन त्या पत्रकारांना मोबाईल देण्यात आले़
(वार्ताहर)

Web Title: Sameer Saradana gets bail on conditioned bail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.