साळगावकर बंधूंना अटकपूर्व जामीन

By Admin | Updated: October 10, 2015 01:07 IST2015-10-10T01:07:07+5:302015-10-10T01:07:07+5:30

पणजी : खाण घोटाळाप्रकरणी समीर व अर्जुन साळगावकर यांना येथील विशेष न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.

Salgaokar brothers get anticipatory arrest | साळगावकर बंधूंना अटकपूर्व जामीन

साळगावकर बंधूंना अटकपूर्व जामीन

पणजी : खाण घोटाळाप्रकरणी समीर व अर्जुन साळगावकर यांना येथील विशेष न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर
केला आहे.
बेकायदा उत्खननप्रकरणी एसआयटीने १५ सप्टेंबर २0१४ रोजी अनिल साळगावकर तसेच कंत्राटदार या नात्याने माजी मंत्री ज्योकिम आलेमाव यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविले आहेत. एस. कांतिलाल कंपनीचे एक संचालक या नात्याने अनिल साळगावकर यांना आधी समन्स बजावण्यात आले होते; परंतु ते आजारी असल्याचे व उपचारांसाठी विदेशात असल्याचे वकिलांनी कळविल्याने त्यांचे पुत्र समीर व अर्जुन यांना एसआयटीने समन्स काढले होते. अटक होऊ नये यासाठी दोन्ही बंधूंनी विशेष न्यायालयात धाव घेतली. न्यायाधीश बी. पी. देशपांडे यांच्यासमोर त्यांच्या अर्जावर सुनावणी झाली. या प्रकरणात माजी मुख्य वनपाल शशीकुमार यांनाही एसआयटीने चौकशीसाठी बोलावले होते. (प्रतिनिधी)

Web Title: Salgaokar brothers get anticipatory arrest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.