वाशीच्या बेटाची चर्चकडून विक्री

By Admin | Updated: December 18, 2015 01:57 IST2015-12-18T01:57:17+5:302015-12-18T01:57:44+5:30

पणजी : वाशी येथील निसर्गसंपन्न व खारफुटी आणि चांगले पर्यावरण यांनी व्यापलेल्या बेटावरील एकूण ३ लाख चौरस

Sale from Vashi Island Church | वाशीच्या बेटाची चर्चकडून विक्री

वाशीच्या बेटाची चर्चकडून विक्री

पणजी : वाशी येथील निसर्गसंपन्न व खारफुटी आणि चांगले पर्यावरण यांनी व्यापलेल्या बेटावरील एकूण ३ लाख चौरस मीटर जागा चर्च संस्थेने ग्रामस्थांना अंधारात ठेवून विकली आहे. सरकार याच बेटावर पर्यावरणाचा व खारफुटींचा ऱ्हास करण्यासाठी आता पंचतारांकित हॉटेलला मान्यता देत आहे. याविरुद्ध वाशीचे नागरिक लढतील, असे भारत मुक्ती मोर्चाच्या अध्यक्ष मॅगी सिल्वेरा यांनी गुरुवारी येथे सांगितले.
सिल्वेरा, सॅबी फर्नांडिस व इतरांनी मिळून येथे पत्रकार परिषद घेतली. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अध्यक्षतेखालील गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने वाशी येथे पंचतारांकित हॉटेल उभे करण्यास मान्यता दिली आहे. या मंडळावरील एकाही सदस्याने कधीच वाशी बेटाला भेट दिली नाही व बेटावरील लोकवस्ती, पर्यावरण, खारफुटी, शेते याची पाहणीही केली नाही. भाजपने यापूर्वी कॉर्पोरेट कंपन्यांकडून बराच निधी घेतला आहे व त्यामुळे सरकार वाट्टेल ते प्रकल्प सहज मंजुर करू लागले आहे, असे सिल्वेरा म्हणाल्या.
वाशी येथे पंचतारांकित हॉटेल बांधणे किंवा जुवारीच्या पात्रात मरिना प्रकल्प उभे करणे, या गोष्टी भाजपच्या निवडणूक जाहिरनाम्यात कधीच नव्हत्या. मग आताच त्या कशा पुढे येत आहेत, असा प्रश्न सिल्वेरा यांनी केला. सर्व राजकीय पक्षांना माहिती हक्क कायद्याच्या कक्षेत आणायला हवे, अशीही मागणी सिल्वेरा यांनी केली. चर्च संस्था एकदम कमी किमतीत जमिनी कशा काय विकू शकते, त्यामागे नेमका हेतू काय, असे प्रश्न सॅबी फर्नांडिस यांनी उपस्थित केले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Sale from Vashi Island Church