मराठी राजभाषेसाठी तालुकावार धरणे

By Admin | Updated: December 3, 2015 01:45 IST2015-12-03T01:44:52+5:302015-12-03T01:45:03+5:30

पणजी : मराठी राजभाषेसाठी गो. रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील राजभाषा समितीने लढा तीव्र करण्याचे ठरविले आहे.

For the sake of the Marathi state, the taluka hold | मराठी राजभाषेसाठी तालुकावार धरणे

मराठी राजभाषेसाठी तालुकावार धरणे

पणजी : मराठी राजभाषेसाठी गो. रा. ढवळीकर यांच्या नेतृत्वाखालील राजभाषा समितीने लढा तीव्र करण्याचे ठरविले आहे. दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन राजभाषा समितीने जाहीर केले असून येत्या १0 डिसेंबर रोजी यास सुरुवात होईल, असे ढवळीकर यांनी सांगितले. ८ जानेवारी रोजी पणजीत महामेळावा घेऊन मराठीप्रेमी शक्तिप्रदर्शन करतील, असेही त्यांनी जाहीर केले.
ढवळीकर, अशोक नाईक आदींनी मिळून बुधवारी येथे पत्रकार परिषद घेतली. भाजपच्या प्रमुख नेत्यांनी मराठीला राजभाषा करण्याचे आश्वासन दिले होते. पार्सेकर सरकारने हे आश्वासन पाळण्याची हीच योग्य वेळ आहे. मुख्यमंत्री पार्सेकर हे मराठीला राजभाषा करण्याबाबत सकारात्मक आहेत; पण मराठी राजभाषेचे विधेयक आणण्याबाबत त्यांचे सरकार चालढकल करत आहे, असे ढवळीकर म्हणाले. तीन वर्षे थांबा, त्यानंतर आपण मराठीचा विषय हाती घेऊ, असे मुख्यमंत्रिपदी असताना मनोहर पर्रीकर यांनी सांगितले होते. प्रत्यक्षात आता मुख्यमंत्री पार्सेकर हे २०१७ सालानंतर मराठी राजभाषेचा विषय हाती घेऊ, असे सांगतात. आम्हाला आंदोलन करण्याची इच्छा नव्हती; पण सरकार मराठीवर अन्याय करत असल्यामुळे आम्ही आंदोलन जाहीर करत असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले. राजभाषा कायद्यात दुरुस्ती करणारे विधेयक येत्या अधिवेशनात सरकारने मांडून मंजूर करावे, अशी मागणी त्यांनी केली.
मराठीला राजभाषा कायद्याद्वारे यापूर्वी जे काही दिले गेले आहे, तेदेखील सरकार देत नाही. केवळ इंग्रजी व कोकणीचाच वापर करून मराठीला डावलले जाते. कोकणीस आमचा विरोध नाही. कोकणी व मराठी या दोन्ही गोव्याच्या भाषा आहेत. मराठीचा वापर गोव्यात जास्त होत आहे आणि राज्यभर मराठीप्रेमींची संख्या खूप मोठी आहे. आम्ही कोकणीसोबत मराठीलाही राजभाषा करा, अशी मागणी करत आहोत, असे ढवळीकर म्हणाले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: For the sake of the Marathi state, the taluka hold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.