शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील साईभक्त पदयात्रेतून शिर्डीकडे रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2019 14:03 IST

वयाची 75 वर्षे गाठलेल्या जेष्ठ नागरिकांपासून ते 20 वर्षीय युवकापर्यंतचे 70 साईभक्त बुधवारी (6 फेब्रुवारी) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गोव्यातून पदयात्रेद्वारे निघाले आहेत.

म्हापसा : वयाची 75 वर्षे गाठलेल्या जेष्ठ नागरिकांपासून ते 20 वर्षीय युवकापर्यंतचे 70 साईभक्त बुधवारी (6 फेब्रुवारी) शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी गोव्यातून पदयात्रेद्वारे निघाले आहेत. साई भक्त परिवारातर्फे सुरू करण्यात आलेल्या या पहिल्या आणि दीर्घ पल्ल्याच्या दुस-या पदयात्रेला म्हापसा शहरातील टॅक्सी स्थानकावर असलेल्या साई मंदिरापासून सुरुवात झाली. ही पदयात्रा शिर्डीपर्यंतचा 550 किलोमीटरचा प्रवास 15 दिवसांत पूर्ण करुन शिर्डीमध्ये पोहोचणार आहे. या पदयात्रेची सांगता 20 फेब्रुवारीला शिर्डीमध्ये दाखल झाल्यानंतर केली जाणार आहे.  

टॅक्सी स्थानकावर साईंच्या आरती आणि जयजयकार केल्यानंतर यात्रेला शुभारंभ म्हापसा पालिकेतील नगरसेवक आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. 15 दिवसांच्या या प्रवासात दरदिवशी सरासरी 40 ते 50 किलोमीटर तर शेवटच्या दिवशी 15 ते 20 किलोमीटर यात्रा केली जाणार असल्याची माहिती संस्थापक प्रशांत वेर्लेकर यांनी दिली. ही पदयात्रा धारगळ मार्गे बांदा, आंबोली, गडहिंग्लज, चिकोडी-तासगाव, विटा, बारामती, दौंड-नगर ते शिर्डी असा प्रवास करणार आहे. शेवटच्या दिवशी पदयात्रा दिंडी तसेच गजराने साई मंदिरात प्रवेश करणार असल्याची माहिती यावेळी त्यांनी दिली. 

संस्थेने आयोजित केलेली ही यंदाची सहावी पदयात्रा आहे. 2013 साली सुरू झालेल्या या पदयात्रेत त्यावेळी सहभागी साईभक्तांची संख्या ७ होती. आता ही संख्या सत्तरच्या घरात गेली आहे. गेल्या वर्षी सुमारे ३५ भक्त सहभागी झाले होते. काही भक्तगण वाटेत सुद्धा यात्रेत सहभागी होत असतात. त्यात गोव्यातील विविध भागातून आलेल्या साईभक्तांसोबत महाराष्ट्र तसेच कर्नाटकातील भक्तांचा सुद्धा समावेश असल्याचे ते म्हणाले. 

पूर्वी ही यात्रा सर्वात जास्त किलोमीटर अंतर पार करुन शिर्डीत जाणारी यात्रा होती; पण आता दिल्लीतून सुद्धा शिर्डीपर्यंत एक पदयात्रा येत असल्याने ही दुसरी लांब पल्ल्याची यात्रा असल्याची माहिती निलेश वेर्णेकर यांनी दिली. मात्र साईभक्त परिवार ही शिर्डीत यात्रा सुरू करणारी पहिली संस्था असल्याचा दावा यावेळी वेर्णेकर यांच्या वतीने करण्यात आला. यात्रेत पढंरीची वारी करणारे वारकरी सुद्धा समावेश होतात असेही यावेळी सांगितले. 

यात्रा दरम्यान प्रत्येक ठिकाणी चांगले स्वागत तसेच केले जाते. ज्या गावात रात्रीचे वास्तव्य केले जाते त्या गावातील लोकांकडून चांगले सहकार्य सुद्धा केले जाते. काही भक्तांकडून महाप्रसाद तसेच इतर कार्यक्रम सुद्धा आयोजित केले जातात. काही गावात तर गोव्यात सुद्धा वारकरी असल्याचे पाहून आश्चर्य व्यक्त केले जात असल्याचे वेर्णेकर यांनी माहिती देऊन सांगितले. 

टॅग्स :shirdiशिर्डीgoaगोवा