साबाजी शेट्ये मुरगावचे नवे उपजिल्हाधिकारी
By Admin | Updated: July 9, 2015 01:17 IST2015-07-09T01:17:11+5:302015-07-09T01:17:20+5:30
पणजी : सहा कनिष्ठ श्रेणी अधिकारी आणि चार मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश बुधवारी काढण्यात आला. तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये

साबाजी शेट्ये मुरगावचे नवे उपजिल्हाधिकारी
पणजी : सहा कनिष्ठ श्रेणी अधिकारी आणि चार मामलेदारांच्या बदल्यांचा आदेश बुधवारी काढण्यात आला. तिसवाडीचे उपजिल्हाधिकारी साबाजी शेट्ये यांची मुरगावला बदली केली असून तेथील उपजिल्हाधिकारी गौरीश शंखवाळकर यांची तिसवाडी येथे बदली करण्यात आली आहे.
राज्य माहिती आयोगाच्या अवर सचिव सिध्दी हळर्णकर यांना जलस्रोत खात्यात उपसंचालक (प्रशासन) या पदावर पाठवले आहे, तर जलस्रोत खात्याचे उपसंचालक (प्रशासन) महेश खोर्जुवेकर यांची उत्तर जिल्हा पंचायत उपसंचालकपदी बदली केली आहे. राज्य कारागीर प्रशिक्षण केंद्राच्या साहाय्यक संचालक (प्रशासन) पी. मुरगावकर यांची क्रीडा खात्यात उपसंचालकपदी बदली केली आहे. उत्तर जिल्हा पंचायत उपसंचालक दशरथ रेडकर यांची राज्य माहिती आयोग अवर सचिवपदी बदली केली आहे. चार मामलेदारांच्या बदल्या करण्यात आल्या असून तिसवाडीचे मामलेदार मधू नार्वेकर यांची बार्देस मामलेदारपदी बदली केली आहे. बार्देसच्या शमा नार्वेकर यांची बार्देस संयुक्त मामलेदार- ३ या पदावर तर सासष्टीचे संयुक्त मामलेदार-३ प्रवीण परब यांची बार्देस संयुक्त मामलेदार-२ पदावर आले आहेत. तिसवाडीच्या संयुक्त मामलेदार-३ वीरा नायक यांना तिसवाडी मामलेदारपदी नेमले आहे.