धुळ प्रदुषणामुळे स्मार्ट सिटीची उपाययोजनांसाठी धावपळ
By पूजा प्रभूगावकर | Updated: March 30, 2024 16:22 IST2024-03-30T16:21:06+5:302024-03-30T16:22:41+5:30
धुळ प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याची फवारणी करणे, धुळ हटवण्यासाठी रस्त्याची नियमिपणे सफाई करणे आदी पावले त्यांनी घेतली आहे.

धुळ प्रदुषणामुळे स्मार्ट सिटीची उपाययोजनांसाठी धावपळ
पूजा नाईक प्रभूगावकर,पणजी: स्मार्ट सिटीच्या कामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळ प्रदुषणाविरोधात पणजीच्या नागरिकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्याने इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलोपमेंट लिमिटेड (आयपीएससीडीएल)ला जाग आली आहे.
धुळ प्रदुषणावर नियंत्रण आणण्यासाठी पाण्याची फवारणी करणे , धुळ हटवण्यासाठी रस्त्याची नियमिपणे सफाई करणे आदी पावले त्यांनी घेतली आहे.उच्च न्यायालयाचे न्यायधिश १ एप्रिल रोजी पणजीची पाहणी करणार आहेत.
पणजीतील धुळ प्रदुषणावर नियंत्रण आणण्याची जबाबदारी ही आयपीएससीडीएल प्रमाणेच कंत्राटदार एजंसी मेसर्स बागकिया, मेसर्स एमव्हीआर व मेसर्स बन्सल यांच्यावर देण्यात आली आहे. यात स्मार्ट सिटीची कामे ज्या ठिकाणी सुरु आहेत., तेथे दिवसांतून दोन वेळा टॅंकरव्दारे पाणी आणून पाण्याची फवारणी करणे जेणे करुन धुळ उडणार नाही.तसेच आजूबाजूच्या परिसरात धुळ उडून नागरिकांना व पर्यावरणाला हानी पोचणार नाही असे स्मार्ट सिटीने नमूद केले आहे.