रूपेश सामंतचा आज फैसला

By Admin | Updated: October 30, 2015 02:22 IST2015-10-30T02:21:46+5:302015-10-30T02:22:01+5:30

पणजी : लैंगिक छळ प्रकरणातील संशयित तथा बदनाम पत्रकार रूपेश सामंत याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी खंडपीठ निवाडा देणार आहे

Rupesh Samant's decision today | रूपेश सामंतचा आज फैसला

रूपेश सामंतचा आज फैसला

पणजी : लैंगिक छळ प्रकरणातील संशयित तथा बदनाम पत्रकार रूपेश सामंत याच्या अटकपूर्व जामीन अर्जावर शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाचे पणजी खंडपीठ निवाडा देणार आहे. दोन्ही बाजूने युक्तिवाद एकाच दिवशी पूर्ण करण्यात आल्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी निवाडा ठेवण्यात आला आहे.
१ नोव्हेंबरपासून न्यायालयाला १५ दिवस सुट्टी आहे. संशयिताच्या वतीने अ‍ॅड. शिरीष गुप्ते यांनी या प्रकरणात रूपेशला निवाडा होईपर्यंत अटक न करण्याचा अंतरिम आदेश देऊन १५ दिवसांनंतर सुनावणी घेण्याची मागणी केली होती; परंतु त्याला सरकारी वकील संतोष रिवणकर यांनी हरकत घेताना आपण अर्ध्या तासात युक्तिवाद पूर्ण करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे न्यायमूर्ती के. एल. वढाणे यांनी गुप्ते यांनाही संशयिताच्या बाजूने अर्ध्या तासात युक्तिवाद संपविण्यास सांगितले. दोघांचे युक्तिवाद सायंकाळी ५.३० वाजता संपले. या प्रकरणात शुक्रवारी निवाडा देणार असल्याचे न्यायाधीशांनी जाहीर केले. म्हापसा सत्र न्यायालयाने रूपेश याचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर त्या निवाड्याला आव्हान देणारी याचिका २३ आॅक्टोबर रोजी सामंतने खंडपीठात सादर केली होती.
रूपेशच्या बाजूने युक्तिवाद करताना त्याचे वकील गुप्ते यांनी हा सारा प्रकार म्हणजे रूपेशविरुद्ध कारस्थान असल्याचा दावा केला. तो एका न्यूज एजन्सीसाठी गेली १० वर्षे काम करीत आहे. त्याला मिळत गेलेल्या बढत्या आणि झालेली प्रगती ही काही जणांसाठी असुयेचे कारण ठरले आणि त्यामुळेच त्याला या प्रकरणात गोवल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकरणात गुन्हा नोंदविण्यात आल्यानंतर चौकशीसाठी हजर राहणार असल्याचे त्याने पोलिसांना कळविले होते; परंतु नंतर अटकपूर्व जामिनासाठी म्हापसा सत्र न्यायालयात अर्ज केल्यामुळे तो पोलिसांसमोर गेला नाही, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Rupesh Samant's decision today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.