रूपेश सामंतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

By Admin | Updated: October 15, 2015 02:16 IST2015-10-15T02:15:56+5:302015-10-15T02:16:53+5:30

म्हापसा : युवतींच्या लैंगिक छळप्रकरणी महिला पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झालेला पत्रकार रूपेश सामंत याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे.

Rupesh Samant's anticipatory bail application is rejected | रूपेश सामंतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

रूपेश सामंतचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

म्हापसा : युवतींच्या लैंगिक छळप्रकरणी महिला पोलीस स्थानकात गुन्हा नोंद झालेला पत्रकार रूपेश सामंत याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याने केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावर मागील आठवड्यात युक्तिवाद संपल्यानंतर अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यावरील निर्णय राखून ठेवला
होता. अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर त्याला कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता आहे.
सामंत याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावताना न्यायाधीश विजया पोळ यांनी सामंत याचा गुन्हा संवेदनशील व गंभीर स्वरूपाचा असल्याचे म्हटले आहे. त्याला अटक केल्यास त्याच्या विरोधात आणखी पीडित मुली समोर येऊ शकतील.
त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची असल्याने तसेच रूपेश याने केलेले हे
कृत्य घृणास्पद असल्याने अर्ज फेटाळत असल्याचे म्हटले आहे.
हा निवाडा देताना न्यायालयाने पीडित मुलींनी सामंत याच्या विरोधात महिला पोलीस स्थानकात तक्रार करण्यास लावलेल्या विलंबाचे समर्थन करून विलंबास दिलेली कारणे समर्थनीय असल्याचे म्हटले आहे. काहींनी घडलेल्या प्रकाराची वाच्यता आपल्या मैत्रिणीजवळ केली होती. काहींनी व्यवस्थापनावर विश्वास नसल्याने तक्रार केली नव्हती,
(पान २ वर)

Web Title: Rupesh Samant's anticipatory bail application is rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.