आरटीओची ‘नाईट शिफ्ट’
By Admin | Updated: August 4, 2015 02:33 IST2015-08-04T02:33:31+5:302015-08-04T02:33:57+5:30
पणजी : रात्रीच्यावेळी बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीतील बेशिस्त मोडून काढण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना आता सायंकाळी ६ ते रात्री २ पर्यंत

आरटीओची ‘नाईट शिफ्ट’
पणजी : रात्रीच्यावेळी बेदरकारपणे वाहने चालविणाऱ्यांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीतील बेशिस्त मोडून काढण्यासाठी आरटीओ अधिकाऱ्यांना आता सायंकाळी ६ ते रात्री २ पर्यंत दुसरी पाळी चालू केली जाईल. अंमलबजावणी विभागातील अधिकारी रात्रीचे गस्तीवर जातील, असे वाहतूकमंत्री सुदिन ढवळीकर यांनी विधानसभेत जाहीर केले.
चेकनाक्यांवर आॅनलाईन सुविधा व वजनकाटा आल्यानंतर भ्रष्टाचारही कमी होईल, असा दावा त्यांनी केला. २००८ साली या खात्याचा वार्षिक महसूल ९२ कोटी रुपये होता. तो आज ४१३ कोटींवर पोचला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. रेंट अ कारचा प्रश्न चतुर्थीपूर्वी सोडवू. १८०० टॅक्सीवाल्यांनी अर्ज केले असले, तरी गरीब, गरजूंनाच या योजनेत सामावून घेतले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. वाहतूक खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते.
काणकोण-मडगाव खासगी बसमार्ग सरकार ताब्यात घेईल, असे ढवळीकर यांनी जाहीर केले. ड्रायव्हर खासगी बसवाल्यांचा असेल. बाकी व्यवस्था कदंब महामंडळ सांभाळणार असल्याचे ते म्हणाले.
आठवी ते बारावीपर्यंत विद्यार्थ्यांना वाहतूक व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम लागू करण्याचा प्रस्ताव आहे. राज्यात एकूण ७० अपघातप्रवण क्षेत्रे आढळून आली असून पोलीस, आरटीओ, बांधकाम खात्याने (पान २ वर)