सावर्डेत खनिजवाहू ट्रकांवर दगडफेक

By Admin | Updated: December 24, 2015 01:51 IST2015-12-24T01:51:35+5:302015-12-24T01:51:45+5:30

सावर्डेत खनिजवाहू ट्रकांवर दगडफेक

Roadside mining trucks | सावर्डेत खनिजवाहू ट्रकांवर दगडफेक

सावर्डेत खनिजवाहू ट्रकांवर दगडफेक

सावर्डे : सेसा वेदांता कंपनीच्या ई-खनिज लिलावातील मालाची वाहतूक करणाऱ्या चार ट्रकांवर अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली. धडे आणि गांधीनगर येथे बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुडचडेचे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी अनोळखींवर गुन्हा दाखल केल्याचे सांगितले.
कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जी. ए. ०९-यू ३९१७, जी. ए. ०९-यू ४०४७, जी. ए. ०९-यू २१७०, जी. ए. ०९-यू ३७७० असे काचा फोडलेल्या चार ट्रकांचे क्रमांक आहेत. या घटनेनंतरही ट्रकचालकांनी वाहतूक सुरू ठेवली. कोडली ते कापसे-सावर्डे अशी ही वाहतूक सुरू आहे.
खनिज वाहतूक दर वाढवून मिळावा यासाठी ट्रकमालकांचे आंदोलन सुरू आहे. सुमारे पंधरा दिवस झाले, तरी आंदोलन
सुरू असल्याने असंतोष धुमसत आहे. पोलीस बंदोबस्त असतानाही रस्त्याच्या कडेला लपून बसलेल्या अनोळखींनी ट्रकांवर दगडफेक केली. ई-लिलावातील खनिज मालाची कंपनीतर्फे सरकारी दरानुसार वाहतूक सुरू आहे. त्यासाठी सावर्डे-तिस्क, कापसे, कोडली येथे मोठा पोलीस बंदोबस्त आहे. गुरुवारीही (दि. २४) ही वाहतूक सुरू राहणार आहे आणि मोठा पोलीस बंदोबस्त असेल, असे कुडचडेचे पोलीस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी सांगितले. (लो. प्र.)

Web Title: Roadside mining trucks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.