गोव्यातील दोन्ही जागांचा निकाल तीन तासांत

By Admin | Updated: May 16, 2014 01:06 IST2014-05-16T01:01:14+5:302014-05-16T01:06:42+5:30

पणजी : गोव्यात शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे.

The result of the two seats in Goa will be within three hours | गोव्यातील दोन्ही जागांचा निकाल तीन तासांत

गोव्यातील दोन्ही जागांचा निकाल तीन तासांत

पणजी : गोव्यात शुक्रवारी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे. उत्तर व दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघ या दोन्ही जागांचे निकाल अवघ्या तीन तासांत म्हणजे सकाळी अकरा वाजेपर्यंत स्पष्ट होण्याची दाट शक्यता आहे. सकाळी आठ वाजल्यापासून कडेकोट पोलीस बंदोबस्तात मडगाव व पणजी अशा दोन ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया सुरू होईल. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातील मतांची मोजणी कांपाल येथील बाल भवनमध्ये होईल. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील मतांची मोजणी दामोदर कॉलेज व कारे महाविद्यालय अशा दोन ठिकाणी होणार आहे. राज्यात मतदान प्रक्रियेसाठीएकूण १ हजार ६२३ इलेक्ट्रॉनिक यंत्रे वापरण्यात आली होती. मतपत्रिकांद्वारे झालेल्या मतांची मोजणी प्रारंभी होईल. उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघासाठी सुमारे बाराशे मतपत्रिकांद्वारे, तर दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी सुमारे आठशे मतपत्रिकांद्वारे मतदान झाले आहे. पणजी व मडगाव येथील मतमोजणी केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. उत्तर गोव्यात फक्त सात उमेदवार व दक्षिण गोवा मतदारसंघात बारा उमेदवार रिंगणात होते. दोन्ही जागांसाठी मिळून राज्यात विक्रमी म्हणजे सुमारे ७७ टक्के मतदान झाले. उत्तर गोव्यासाठी ७९ टक्के तर दक्षिण गोव्यासाठी ७५ टक्के मतदान झाले होते. उत्तर गोव्यात खासदार श्रीपाद नाईक हे जिंकतील, तर दक्षिण गोव्यात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत असल्याने गोमंतकीयांचे लक्ष विशेषत: दक्षिण गोव्यातील मतमोजणीकडे लागून आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: The result of the two seats in Goa will be within three hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.