शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेसोबत जाण्याची काँग्रेस कार्यकर्त्यांची इच्छा नाही; हर्षवर्धन सपकाळ स्पष्टच बोलले
2
युगांडामध्ये भीषण अपघात, बसची वाहनांना धडक, ६३ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
3
आडनावामुळं टीम इंडियातून वगळलं? शमा मोहम्मद यांचा 'गंभीर' आरोप! माजी क्रिकेटर म्हणाला, असं कधीच...
4
षडयंत्र! दररोज ४० मिनिटे जिहाद ट्रेनिंग; ५०० रूपयांत दहशतवादी मसूद अजहरची बहीण चालवतेय कोर्स
5
फरार मेहुल चोक्सीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा; बेल्जियम कोर्टाची प्रत्यर्पणास मंजुरी
6
तब्बल ५५०० किलो सोन्यातून उजळले भगवान बुद्ध; एका चुकीने उलगडलं कित्येक दशक दडलेले 'रहस्य'?
7
"अक्षय कुमार सध्या डिप्रेशनमध्ये आहे, कारण..."; 'हेरा फेरी'चे दिग्दर्शक प्रियदर्शन यांचा मोठा खुलासा
8
शौक बड़ी चीज है! दृष्टी गमावताच डोळ्यात बसवला २ कॅरेटचा हिरा, रंगली तुफान चर्चा
9
‘निवडणुका जवळ आल्याने सत्ताधारी आमदारांना निधीच्या रूपात वाटली जातेय खैरात’, काँग्रेसचा आरोप
10
मारुतीच्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV ची प्रतीक्षा संपली, डिसेंबरमध्ये होणार लाँच, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स
11
हृदयस्पर्शी! आधी लेक गमावली, मुलालाही झाला तोच आजार; आईने लिव्हर देऊन वाचवला जीव
12
काय सांगता? स्मृती इराणींच्या 'या' मालिकेत झळकणार बिल गेट्स; कोणतं पात्र साकारणार?
13
अवघी ४० हजार लोकसंख्या, एकही विमानतळ नाही! तरीही जगातील श्रीमंत देशांच्या यादीत 'हा' देश कसा?
14
दिवाळीला रितेश देशमुख कुटुंबापासून दूर, मुलांनी लिहिलेलं पत्र वाचून म्हणाला, "और जीने को..."
15
फ्रान्सच्या संग्रहालयात 'धूम' स्टाईल चोरी; ८०० कोटींचे दागिने घेऊन चोर फरार; ७ मिनिटांत झाला 'गेम'
16
आघाडीबाबत भाई जगताप यांच्या विधानामुळे मविआत फटाके, नंतर स्पष्टीकरण देत म्हणाले...
17
Neeraj Chopra Lieutenant Colonel : राजनाथ सिंह अन् सेनाप्रमुखांकडून 'गोल्डन बॉय'चा सन्मान (VIDEO)
18
अंतर्गत मतभेदांदरम्यान टाटा ट्रस्ट्सनं वेणू श्रीनिवासन यांची आजीवन विश्वस्त म्हणून केली नियुक्ती; आता मेहली मिस्त्री यांच्यावर नजर
19
मोठी बातमी! सोन्या-चांदीचा बुडबुडा फुटला....! एकच झटक्यात सोनं 3725 तर चांदी 10549 रुपयांनी स्वस्त! जाणून घ्या कारण
20
भारी! WhatsApp, Instagram चॅटिंग होणार सुरक्षित; स्कॅम रोखण्यासाठी मेटाने आणलं नवीन टूल

गोव्यात मखरांच्या सजावटीसाठी थर्माकॉलच्या वापरावर येणार निर्बंध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 13:41 IST

गोव्यात गणेश चतुर्थीत थर्माकॉल वापरून केल्या जाणाऱ्या सजावटीवर आता निर्बंध येणार आहेत.

ठळक मुद्देगोव्यात गणेश चतुर्थीत थर्माकॉल वापरून केल्या जाणाऱ्या सजावटीवर आता निर्बंध येणार आहेत. विधानसभेत नुकतेच संमत झालेल्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर थर्माकॉलच्या वापरावरही निर्बंध येतील. गणेशोत्सवात थर्माकॉल वापरुन केल्या जाणाऱ्या सजावटीला यामुळे आळा बसेल, असा दावा केला जात आहे. 

पणजी - गोव्यात गणेश चतुर्थीत थर्माकॉल वापरून केल्या जाणाऱ्या सजावटीवर आता निर्बंध येणार आहेत. विधानसभेत नुकतेच संमत झालेल्या विधेयकाला राज्यपालांनी मंजुरी दिल्यानंतर थर्माकॉलच्या वापरावरही निर्बंध येतील. गणेशोत्सवात थर्माकॉल वापरुन केल्या जाणाऱ्या सजावटीला यामुळे आळा बसेल, असा दावा केला जात आहे. 

राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष गणेश शेटगांवकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘विधानसभेत संमत करण्यात आलेल्या ‘नॉन बायोडिग्रेडेबल गार्बेज कंट्रोल अ‍ॅक्ट’ या कायद्यात प्लास्टिक बरोबरच थर्माकॉल वापरावरही निर्बंधांची तरतूद आहे. १ जानेवारी २0२0 पासून राज्यात प्लास्टिकबंदीची कठोर अंमलबजावणी केली जाईल, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विधानसभेत आधीच जाहीर केले आहे. वरील विधेयकात प्लास्टिक पिशव्यांचा वापर, उत्पादन तसेच तो जाळल्यास दंड तसेच कैदेची तरतूद आहे. प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात जाळल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी २५ हजार रुपये दंड आणि दुसºयांदा हाच गुन्हा केल्यास ५० हजार रुपये व ५ दिवस कैद अशा शिक्षेची तरतूद आहे. 

प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन, आयात करणाऱ्यांना पहिल्या गुन्ह्यासाठी ५० हजार रुपये, दुसऱ्या गुन्ह्यासाठी १ लाख रुपये आणि त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी ३ लाख रुपये दंड व तीन महिन्यांपर्यंत कैद अशी शिक्षेची तरतूद आहे. प्लास्टिक पिशव्यांचा वापर, विक्री केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी २५०० रुपये, दुसऱ्यांदा हाच गुन्हा केल्यास ३५०० रुपये व त्यानंतरच्या प्रत्येक गुन्ह्यासाठी ५ हजार रुपये दंड आणि पाच दिवसांची कैद अशी शिक्षेची तरतूद केली आहे. या सर्व तरतुदी थर्माकॉलच्या वापरालाही लागू होतील. 

प्लास्टर ऑफ पॅरीसच्या गणेश मूर्तींबाबत राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने कोणती पावले उचलली आहेत, असा प्रश्न केला असता पीओपी मूर्तींवर बंदी आहे. परंतु अशा संशयास्पद मूर्तींचे नमुने आल्याशिवाय कारवाई करता येत नाही. हस्तकला महामंडळ मूर्तीकारांना अनुदान देते त्यांच्याकडे चित्रशाळांची माहिती उपलब्ध आहे. पीओपी मूर्तींचे नमुने त्यांनी सादर केल्यास आमच्या प्रयोगशाळेत ते तपासून पुढील कारवाई करता येते. 

‘हिंदु जनजागृती’चे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना भेटले

दरम्यान, हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी श्रीमती आर. मेनका यांची भेट घेऊन त्यांना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींच्या विक्रीवर बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी कृती दल स्थापन करण्याची मागणी करणारे निवेदन दिले. राज्यातील काही ठिकाणी अशा मूर्तींची विक्री होत असल्याचा समितीचा दावा आहे.प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवण्यात येणाऱ्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर पाण्यावर तरंगतात. त्यातून श्री गणेशाची विटंबना होते. 

यापूर्वी गोवा शासनाने प्लास्टर ऑफ परिसच्या श्री गणेशमूर्तींची आयात आणि विक्री रोखण्यासाठी कृती दल स्थापन केले होते. यामध्ये पर्यावरण खाते, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, अबकारी खाते, व्यावसायिक कर विभाग आणि पोलीस खाते यांच्या अधिकाऱ्यांचा समावेश होता, असे राज्य समन्वयक मनोज सोळंकी म्हणाले. 

‘चेक नाक्यांवर यंत्रणा हवी’

माजी आमदार दामू नाईक यांनी पीओपी मूर्तींवर बंदी यावी यासाठी सुरवातीपासून पाठपुरावा केला होता. त्यांना विचारले असता ते म्हणाले की, चेक नाक्यांवर पीओपी मूर्ती तपासण्याची कोणतीही यंत्रणा नाही. पोलिस या मूर्ती तपासू शकत नाहीत कारण त्यांना त्याचे ज्ञान नसते त्यामुळे शेजारी राज्यांमधून अशा मूर्ती गोव्याच्या बाजारात येतात. सरकारने मूर्ती तपासण्याची यंत्रणा चेक नाक्यांवरच करायला उपलब्ध करायला हवी.  

टॅग्स :goaगोवाenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण