शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
2
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
3
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
4
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
5
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
6
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
7
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
8
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
9
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
10
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?
11
'हिंदी भाजपची भक्ती नव्हे तर सक्ती', भाजप मनसेमध्ये शिलगला वाद, शिवसेना भवनाच्या अंगणात एकमेकांवर वॉर
12
Chanakyaniti: 'या' तीन गोष्टी कायम गुपित ठेवा, नाहीतर अडचणीत याल!- आचार्य चाणक्य!
13
धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाच्या पत्नीचा संशयास्पद मृत्यू? अंजली दमानियांच्या आरोपाने खळबळ 
14
Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
15
"मी सर्व मर्यादा पार केल्या", 'त्या' विधानानंतर अनुराग कश्यपने मागितली ब्राह्मण समाजाची माफी
16
₹१,००० ची म्युच्युअल फंडातील गुंतवणूक बनवू शकते कोट्यधीश, फक्त करावं लागेल 'हे' काम
17
मनी लाँड्रिंग म्हणजे नेमकं काय? अभिनेता महेश बाबू यांच्या प्रकरणातून समजून घ्या; का आली ईडीची नोटीस?
18
जसप्रीत बुमराह आणि स्मृती मानधना ठरले जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, मिळाला मोठा सन्मान!
19
Palmistry: तळहाताच्या 'या' उंचवट्यावर तीळ, हे तर राजयोग प्राप्त होण्याचे लक्षण!
20
कर्जाची रक्कम वसूल करण्यासाठी रिकव्हरी एजंट घरी येऊ शकतात का? काय सांगतो कायदा

काणकोणमध्ये पक्ष कार्यकर्त्यांत मानापमान; नाराजांना पक्ष नेतृत्वाकडून बोलावण्याची प्रतीक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2024 09:31 IST

असंतुष्टांशी कोणीच संपर्क साधलेला नाही.

संजय कोमरपंत, लोकमत न्यूज नेटवर्क, काणकोण: काणकोणचे आमदार तथा सभापती रमेश तवडकर यांनी भाजपचे दक्षिण गोवा उमेदवार पल्लवी धेंपो यांना किती मतांची आघाडी काणकोणात मिळेल ते जाहीर केले. तर काणकोण नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी त्यात भर घातली.

काणकोण तालुक्यात एकूण ३४,३५८ मतदार असून पालिका क्षेत्रात १०,२९३ मतदार आहेत तर ५९ बूथ आहेत. भाजप निवडणूक जवळ आली की कामाला लागण्याऐवजी आपल्या कार्यकर्त्याना ३६५ दिवस कामाला लावतो. त्यामुळेच पक्षाला, पक्षाच्या आमदारांना, पक्षाच्या वरिष्ठांना मतदारसंघातील चित्र दिसणे स्वाभाविक आहे. मात्र, गेल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी सत्तेची फळे चाकली त्या दोन भाजप माजी आमदार विजय पै खोत व माजी मंत्री इजिदोर फर्नांडिस यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार रमेश तवडकर यांच्या विरोधात निवडणूक लढविली होती. ज्यामुळे भाजपाची १०८०३ मते फोडली गेली. त्यामुळेच तवडकरांना ९०६३ मते मिळाली. फक्त ३० टक्के मतावरच समाधान मानावे लागले होते.

पंचायतीच्या व नगरपालिकेच्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मतदान होत असते, असे चित्र विधानसभा अथवा लोकसभा निवडणुकीत दिसत नाही. विधानसभा निवडणुकीपेक्षा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारीही थोडी कमीच असते. सध्या दक्षिण गोव्यात आरजीपीचे रुबर्ट परेरा, काँग्रेसचे विरियातो फर्नांडिस, तर भाजपाच्या पल्लवी धेपो हे उमेदवार रिंगणात आहेत. रुबर्ट परेरा यानीही काणकोणात येऊन काही ठिकाणी मतदाराना मिळण्याचा प्रयत्न केला. तर काँग्रेसच्या फर्नाडिस यांनी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी व उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ७ वेळा काणकोणच्या विविध भागात दौरा केलेला आहे. मात्र, प्रचारकार्यांत भाजपाचा हात ते अजुन पर्यंत धरु शकलेले नाहीत.

भाजपचे ५९ ही बूथवर बूथ यंत्रणा, शक्तिप्रमुख असून आता नव्याने भाजपाने पन्ना प्रमुखाचीही निवड केली आहे. एका पन्ना प्रमुखाने मतदारयादीच्या एका पानावरील ३० मतदारांवरच लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यातील अधिकाधीक २० तरी मते भाजपाला मिळावीत अशा प्रकारे काम करण्याची पद्धती वरिष्ठानी कार्यकर्त्यांना शिकवितानाच जबाबदारी वाटुन दिलेली आहे. परंतु, ही जबाबदारी पन्ना प्रमुख यशस्वी करून दाखविण्यास काही अडचणी आहेत. 

काणकोण भाजपात असंतुष्ट देखील आहेत. त्याचप्रमाणे काँग्रेसमध्येही असंतुष्ट आहेत. या असंतुष्टांशी कोणीच संपर्क साधलेला नाही वा विश्वासात घेतलेले नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या जनार्दन भंडारी यांनीकाँग्रेसकडून निवडणुक लढवित असतानाच मुळ काँग्रेसचे असलेले महादेव देसाई यांनी तृणमूल कॉग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढविली होती. जे भाजपात घडले होते तेच कॉग्रेस पक्षात घडले होते. त्याचा फटका काँग्रेसला बसला होता. तर भाजपाच्या माजी आमदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविल्याने भाजपालाही त्याचा फटका बसला होता.

विजय पै खोत व इजिदोर फर्नांडिस यांनी आपले पत्ते अजून खोललेले नाहीत. पालिका क्षेत्रात १२ नगरसेवकांपैकी ४ नगरसेवक सत्ताधारी मंडळापासून दूर असून सुप्रिया शेखर देसाई यानी गेल्या पालिका निवडणुकीत ३५२ मते घेऊन जयश्री किशोर शेट (३२७) याचा पराभव केला होता. तर पांडुरंग नाईक गावकर यानी किशोर शेट यांच्या विरुद्ध निवडणूक लढवून ४८८ मते घेतली होती. तर किशोर शेट यांना १३२ मते मिळाली होती. शुभम कोमरपंत याने ५२१ मते घेतली होती तर मारुती कोमरपंत यांना २७९ मते मिळाली होती. नीतू समीर देसाई यांना ५०९ मते तर सनिजा देसाई यांना ४५४ मते मिळाली होती. या चारही विरोधी नगरसेवकांची आपल्या प्रभागात घट्ट पकड असून त्याना मिळालेली मते १८७० होतात. १०२९३ मते असलेल्या पालिका क्षेत्रात या चार नगरसेवकाना बाजुला सारून चालणार नाही. हेही तितकेच खरे आहे.

विरियातो फर्नांडिस तसेच विरोधी पक्ष नेते युरी आलेमाव यांनी भंडारी यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता, तो अजुन यशस्वी झालेला दिसत नाही. तर इजिदोर फर्नांडिस यांची साथ धरलेले भाजपाचे माजी मंडळ अध्यक्ष नंदीप भगत व त्याचे इतर साथीदार यांच्याकडे भाजपाने स्थानिक नेतृत्वाला वाईट वाटेल म्हणून कानाडोळा केला आहे. दुसरीकडे भाजपचे कार्यकर्ते आणि एस.टी. नेते तथा खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर यांच्याकडेही नेतृत्वाने पाठ फिरविली आहे.

 

टॅग्स :goaगोवाgoa lok sabha election 2024गोवा लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसBJPभाजपा