शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकीत एसटींना आरक्षण शक्य: मंत्री तवडकर; दिल्लीत केंद्रीय कायदामंत्र्यांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 07:14 IST

एसटी आरक्षणासंदर्भात संसदेत याआधीच विधेयक मंजूर झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मडगाव : आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री रमेश तवडकर यांनी दिल्लीत केंद्रीय कायदामंत्र्यांची शिष्टमंडळासह भेट घेऊन निवेदन सादर केले. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत एसटी समाजाला आरक्षण मिळेल, असा आशावाद या भेटीनंतर तवडकर यांनी व्यक्त केला.

पत्रकारांशी बोलताना तवडकर म्हणाले की, 'एसटी आरक्षणासंदर्भात संसदेत याआधीच विधेयक मंजूर झाले आहे. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे अंमलबजावणीत विलंब होत आहे. या अडचणी दूर करून प्रक्रिया सुलभ करण्याची विनंती आम्ही केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांना केली असून, केंद्रीय मंत्र्यांनी पुढील आठ ते पंधरा दिवसांत आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. २०२७च्या गोवा विधानसभा निवडणुकीत अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळण्याची शक्यता आहे.'

याबाबत माहिती देताना मंत्री तवडकर म्हणाले की, 'अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना आता महत्त्वपूर्ण गती मिळाली आहे. २०२७ च्या निवडणुकीत आरक्षण देण्यासाठी काही अडचणी आहेत, असे मला वाटत नाही.'

आदिवासी भवनसाठी १५ दिवसांत निविदा

मंत्री तवडकर म्हणाले की, 'आदिवासी कल्याण खात्यांतर्गत स्वतंत्र तांत्रिक विभागाची निर्मिती करण्यात आली असून, बहुप्रतीक्षित आदिवासी भवन उभारणीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. येत्या १५ दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल. तसेच, पंचायतींमधील प्रलंबित कामे निकाली काढण्यासाठी पंचायत सचिवांना वाढीव अधिकार देण्यात आले आहेत, जेणेकरून पारदर्शकपणे कामे होतील.'

मंत्री तवडकर म्हणाले की, 'क्रीडा खात्याने उभारलेल्या मैदानांच्या देखभालीसाठी सविस्तर अहवाल मागवण्यात आला असून सरकारी निधीचा विनियोग योग्य पद्धतीने करण्यावर भर दिला जाणार आहे. दरम्यान, मुलांवरील सोशल मीडियाच्या प्रभावावर चिंता व्यक्त करताना ते म्हणाले की, सरसकट बंदी घालण्यापेक्षा पालकांनी आणि समाजाने मुलांमध्ये जनजागृती करणे आवश्यक आहे. तंत्रज्ञानाचा गैरवापर रोखण्यासाठी शाळा-महाविद्यालयीन स्तरावर प्रयत्न व्हायला हवेत, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.

...चार मतदारसंघ राखीव

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार राज्यातील एसटींच्या लोकसंख्येनुसार ४० सदस्यीय विधानसभेत चार जागा एसटींना राखीव ठेवाव्या लागतील. त्यासाठी आधी पुनर्रचना प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. चे एसटींना कोणते चार मतदारसंघ राखीव -र ठेवले जातात याबद्दल उत्कंठा आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : ST Reservation Possible in Assembly Elections: Minister Tawadkar Meets Union Law Minister

Web Summary : Minister Tawadkar anticipates ST reservation in the 2027 Goa Assembly elections after meeting the Union Law Minister. A bill is already sanctioned, and the minister assured expedited action. Efforts are on for tribal welfare including tribal housing and transparent panchayat work.
टॅग्स :goaगोवाreservationआरक्षण