जीवरक्षकांनी झुगारला ‘एस्मा'
By Admin | Updated: December 30, 2015 03:07 IST2015-12-30T03:07:29+5:302015-12-30T03:07:40+5:30
पणजी : जीवरक्षकांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला असून कामावर

जीवरक्षकांनी झुगारला ‘एस्मा'
पणजी : जीवरक्षकांचा संप मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा कायदा (एस्मा) लागू केला असून कामावर हजर न राहिल्यास कारवाई होणार आहे. दुसरीकडे, आंदोलकांचे नेतृत्व करणाऱ्या ‘आयटक’ने एस्मा झुगारून आंदोलन चालूच राहील, असा इशारा दिला आहे.
१९८८च्या अत्यावश्यक सेवा कायद्याचे कलम ३ उपकलम (१) नुसार कारवाई
केली जाईल, असे सरकारने बजावले
आहे. ‘आयटक’चे सचिव सुहास
नाईक यांनी सरकारवर टीकेची झोड उठविताना, सरकारला दुर्बुद्धी सुचली असल्याचे सांगितले.
एकीकडे सरकार या जीवरक्षकांना कंत्राटी कामगार म्हणते आणि दुसरीकडे एस्मा लागू करते. हा कुठला न्याय, असा सवाल नाईक यांनी केला. सरकारी सेवेत कायम असलेल्या कर्मचाऱ्यांनाच एस्मा लावता येतो. एस्मा लावण्याऐवजी सरकारने जमिनीवर येऊन या जीवरक्षकांच्या मागण्या पूर्ण कराव्यात.
वर्षभरापूर्वी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर व मजूरमंत्री आवेर्तान फुर्तादो यांच्या सहीने झालेल्या कराराचे पालन करावे, या मागणीचा नाईक यांनी
पुनरुच्चार केला. (प्रतिनिधी)