मडगावात एकदा विकलेल्या फ्लॅटची पुन्हा विक्री, १२ लाखांची फसवणूक
By सूरज.नाईकपवार | Updated: October 25, 2023 16:43 IST2023-10-25T16:43:11+5:302023-10-25T16:43:36+5:30
सुरेंद्र नाईक हे तक्रारदार आहेत. संशियताने तक्रारदाराच्या आईला फसविले आहे.

मडगावात एकदा विकलेल्या फ्लॅटची पुन्हा विक्री, १२ लाखांची फसवणूक
मडगाव : आधी विक्री केलेला फ्लॅट एका महिलेला पुन्हा विकण्यासाठी करारनामा करून बारा लाख रुपयांना गंडा घालण्याचा घटना उघडकीस आली आहे. फातोर्डा पोलrस ठाण्यात यासंबंधी रीतसर तक्रार नोंद झाली असून, संशयित भास्कर बेगारी याच्याविरोधात पोलिसांनी भादंसंच्या ४२० कलमांखाली गुन्हा नोंद केला आहे.
सुरेंद्र नाईक हे तक्रारदार आहेत. संशियताने तक्रारदाराच्या आईला फसविले आहे. १ ऑगस्ट २०१४ रोजी ही घटना घडली होती. येथील सब रजिस्टार कार्यालयात संशयिताने फ्लॅट विक्रीबाबत करारनामा केला होता. मात्र, त्यापूर्वीच संशयिताने हा फ्लॅट अन्य एकाला विकला होता. आपण फसविलो गेलो हे लक्षात आल्यानंतर संबंधितांनी फातोर्डा पोलिस ठाण्यात याबाबत रीतसर तक्रार नोंद केली. पोलिस निरीक्षक दितेंद्र नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक व्हाय. गावकर तपास करीत आहेत.