मांडवी पुलावरील संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याची आवश्यकता; कॅप्टन ऑफ पोर्टची मागणी
By समीर नाईक | Updated: February 24, 2024 15:47 IST2024-02-24T15:46:38+5:302024-02-24T15:47:03+5:30
गेल्या काही वर्षांत मांडवी पुलावरून अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.

मांडवी पुलावरील संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याची आवश्यकता; कॅप्टन ऑफ पोर्टची मागणी
पणजी: गेल्या काही वर्षांत मांडवी पुलावरून अनेकांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच आता हल्लीच घडलेल्या अपघातातून पुलाच्या सुरक्षेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मांडवी पुलाच्या संरक्षण भिंतीची उंची वाढविण्याची गरज आहे, अशी माहिती कॅप्टन ऑफ पोर्टचे अधिकारी ऑक्टाविओ रॉड्रिग्ज यांनी दिली.
मांडवी पुलावरील आत्महत्येचे प्रमाण व अपघातातून थेट नदीत पडण्याचे प्रमाण पाहता, संरक्षण भिंतीची उंची वाढविणे आवश्यक बनले आहे. तसेच मांडवी पुलावर बॅरीगेट्स, योग्य प्रकारचे कायमस्वरूपी डीवायडर सुरक्षतेचा विचार करता असणे आवश्यक आहे. तरच आत्महत्या, व अपघातातून थेट नदीत पडण्याचे प्रमाण कमी होऊ शकते, असे रॉड्रिग्ज यांनी सांगितले.
कॅप्टन ऑफ पोर्ट लोकांच्या सुरक्षतेहेतू सदैव तत्पर असते. मांडवीवरील अपघाताची माहिती मिळताच आम्ही आमच्याकडील सुमारे ४ पेट्रोलिंग बोट व काही मच्छीमाऱ्यांची बोट घेऊन अपघातग्रस्तला शोधण्यास सुरुवात केली होती. तरीही पुलावरील इतर सुरक्षा देखील महत्वाचे आहे, असेही रॉड्रिग्ज यांनी अधिक माहिती देताना सांगितले.