तीन कॅसिनोंच्या परवान्यांचे नूतनीकरण
By Admin | Updated: November 4, 2015 02:21 IST2015-11-04T02:20:42+5:302015-11-04T02:21:00+5:30
पणजी : मांडवी नदीतून कॅसिनो जहाजे अन्यत्र हलविण्याच्या घोषणा सरकारकडून केल्या जात असल्या, तरी दुसऱ्या बाजूने या नदीतील

तीन कॅसिनोंच्या परवान्यांचे नूतनीकरण
पणजी : मांडवी नदीतून कॅसिनो जहाजे अन्यत्र हलविण्याच्या घोषणा सरकारकडून केल्या जात असल्या, तरी दुसऱ्या बाजूने या नदीतील चारपैकी तीन कॅसिनोंना मांडवीतच राहण्याविषयीच्या परवान्यांचे नूतनीकरण गृह खात्याने करून दिले आहे.
मंत्रिमंडळाने यापूर्वीच्या एका निर्णयाद्वारे तीन कॅसिनोंना मांडवीबाहेर जाण्यास दिलेली मुदत टळून गेली. फक्त चौथ्या कॅसिनोची मांडवीबाहेर जाण्याची मुदत अजून संपुष्टात आलेली नाही.