राजनाथ सिंह यांना मंत्रिमंडळातून काढा
By Admin | Updated: November 27, 2015 01:29 IST2015-11-27T01:29:11+5:302015-11-27T01:29:21+5:30
पणजी : भारतीय घटनेत समाविष्ट केलेल्या ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाबद्दल प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह

राजनाथ सिंह यांना मंत्रिमंडळातून काढा
पणजी : भारतीय घटनेत समाविष्ट केलेल्या ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाबद्दल प्रश्न उपस्थित करून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना विनाविलंब मंत्रिमंडळातून काढून टाकावे, अशी मागणी काँग्रेसचे राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी केली आहे.
लोकसभेतील भाषणात राजनाथ यांनी ‘धर्मनिरपेक्षता’ या शब्दाबद्दल सवाल उपस्थित केला होता. ४२ व्या घटना दुरुस्तीतून हा शब्द आलेला आहे आणि त्याचा सर्रास गैरवापर केला जातो, असे राजनाथ यांनी म्हटले होते. राजनाथ यांनी मंत्रिपद स्वीकारताना घेतलेल्या शपथेचा भंग केला आहे. त्यामुळे त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. राष्ट्रपतींनी त्यांना त्वरित बडतर्फ करावे, अशीही मागणी नाईक यांनी केली. खासदारकीची आणि नंतर मंत्रिपदाची शपथ घेताना घटनेचा आदर व संरक्षण करीन, असे राजनाथ यांनी म्हटले होते, याकडे शांताराम यांनी लक्ष वेधले आहे. (प्रतिनिधी)