त्यापेक्षा मंत्रिमंडळातूनच काढा : दयानंद मांद्रेकर

By Admin | Updated: October 5, 2015 02:27 IST2015-10-05T02:26:50+5:302015-10-05T02:27:05+5:30

माझ्याकडील पंचायत खाते ज्या पद्धतीने काढून घेतले ते पूर्णत: अयोग्य आहे. असे वर्तन करून सरकारने माझी मानहानी केल्याची प्रतिक्रिया मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी

Remove from the cabinet more than that: Dayanand Mandrekar | त्यापेक्षा मंत्रिमंडळातूनच काढा : दयानंद मांद्रेकर

त्यापेक्षा मंत्रिमंडळातूनच काढा : दयानंद मांद्रेकर

जयेश नाईक ल्ल शिवोली
माझ्याकडील पंचायत खाते ज्या पद्धतीने काढून घेतले ते पूर्णत: अयोग्य आहे. असे वर्तन करून सरकारने माझी मानहानी केल्याची प्रतिक्रिया मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी रविवारी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. एक खाते काढून घेण्यापेक्षा मला मंत्रिमंडळातूनच काढले असते तरी चालले असते, असे ते म्हणाले. मंत्रिमंडळातून काढण्याविषयी मी मुख्यमंत्र्यांना सूचित केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पंचायत खाते पूर्वी मुख्यमंत्र्यांकडे होते. ते माझ्याकडे आल्यानंतर मी अनेक कामे केली आहेत. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या मांद्रे मतदारंसघातच तीन पंचायतींची नवीन बांधकामे सुरू झाली आहेत. गोव्यात एकूण १५ पंचायतींची बांधकामे सुरू झालेली आहेत. जे पार्सेकर यांना जमले नाही ते मी करून दाखविले. जी कामे राहिली आहेत, त्यास सार्वजनिक बांधकाम खाते आणि इतर खातीच जबाबदार आहेत.
ते म्हणाले, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मंत्री तसेच आमदारांच्या कामकाजाविषयी सर्व्हे (पान २ वर)

Web Title: Remove from the cabinet more than that: Dayanand Mandrekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.