‘अपना घर’मध्ये पुन्हा राडा
By Admin | Updated: December 5, 2014 01:05 IST2014-12-05T01:03:40+5:302014-12-05T01:05:49+5:30
पणजी : ‘अपना घर’मधील मुलांनी दंगामस्ती करून मोडतोड करण्याचा प्रकार गुरुवारी घडला. अचानक भडकलेल्या १८ मुलांनी ‘अपना घर’मधील ट्यूबलाईट्स व बाहेर उभी करून ठेवलेली कार फोडली.

‘अपना घर’मध्ये पुन्हा राडा
पणजी : ‘अपना घर’मधील मुलांनी दंगामस्ती करून मोडतोड करण्याचा प्रकार गुरुवारी घडला. अचानक भडकलेल्या १८ मुलांनी ‘अपना घर’मधील ट्यूबलाईट्स व बाहेर उभी करून ठेवलेली कार फोडली.
सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. १८ मुलांचा गट अचानक आक्रमक बनला व मिळेल ते काढून फेकून देण्याचा प्रकार त्यांनी सुरू केला. ‘अपना घर’बाहेर असलेल्या नॅनो कारवर त्यांनी हल्ला चढविला. कारच्या काचा
फोडून इतरही नुकसान केले, अशी माहिती ‘अपना घर’चे उपसंचालक दशरथ
रेडकर यांनी प्रसारमाध्यमांशी
बोलताना दिली.
मुलांना काबूत आणण्यासाठी जुने गोवे पोलिसांना बोलवावे लागले. ही मुले का आक्रमक बनली, हे ‘अपना घर’मधील अधिकाऱ्यांनाही माहीत नव्हते. प्रसारमाध्यमांशी बोलायला द्या, न्यायाधीशांशी बोलायला द्या, असे ते ओरडत असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यांना प्रसारमाध्यमांशी काय बोलायचे होते, याबद्दल कुणालाही माहिती नाही.
काही महिन्यांपूर्वी ‘अपना घर’मधील मुलांनी असाच गोंधळ घातला होता. त्या वेळी मुलांनी प्रचंड मोडतोड केली होती. कर्मचाऱ्यांवरही हल्ला चढविला होता. मुलांना नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले होते.