कचरा प्रकल्पाचा निधी परत करण्यास कुडचडे पालिकेचा नकार

By Admin | Updated: May 3, 2014 14:16 IST2014-05-03T13:23:38+5:302014-05-03T14:16:19+5:30

कुडचडे-काकोडा नगरपालिकेला काकोडा येथे कचरा प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यासाठी सरकारने दिलेले १ कोटी ३0 लाख २0 हजार रुपये परत करण्यात यावेत, अशा आशयाचा आदेश पालिका संचालक एल्वीस गोम्स यांनी कुडचडे-काकोडा पालिकेला दिला असून, दिलेल्या रकमेचा पालिकेने संपूर्णपणे विनियोग केला नसल्याचे या आदेशात नमूद केले आहे.

Refuse to return the funds to the garbage project | कचरा प्रकल्पाचा निधी परत करण्यास कुडचडे पालिकेचा नकार

कचरा प्रकल्पाचा निधी परत करण्यास कुडचडे पालिकेचा नकार

सावर्डे : कुडचडे-काकोडा नगरपालिकेला काकोडा येथे कचरा प्रकल्पासाठी जमीन संपादन करण्यासाठी सरकारने दिलेले १ कोटी ३0 लाख २0 हजार रुपये परत करण्यात यावेत, अशा आशयाचा आदेश पालिका संचालक एल्वीस गोम्स यांनी कुडचडे-काकोडा पालिकेला दिला असून, दिलेल्या रकमेचा पालिकेने संपूर्णपणे विनियोग केला नसल्याचे या आदेशात नमूद केले आहे. मात्र, पालिका बैठकीत या आदेशाला विरोध करून पालिकेने जमीन संपादन केलेली असून सरकारने मंजूर केलेल्या संपूर्ण निधीचा वापर होणार आहे, त्यामुळे हा आदेश पालिकेला लागू होत नसल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.
पालिका संचालनालयाने २२ एप्रिल रोजी एक लेखी आदेश पाठवून त्यात खरंगट्याघाटी-काकोडा येथे ६५ हजार चौ.मी. जागेत कचरा विल्हेवाटीसाठी जमीन संपादन करण्यासाठी वरील रक्कम मंजूर केली होती. मात्र, पालिकेने नियम ४ खाली कलम ८६(२)(जे) गोवा नगरपालिका कायदा १९६८ नुसार संपादन केलेली जमीन वापरात न आल्याने त्या जागी सरकारने नवीन कचरा व्यवस्थापनातून नवा प्रकल्प उभारण्यासाठी नवीन आदेश काढला होता. मात्र, पालिकेने अद्याप त्या जागी कसलाच कचरा प्रकल्प उभारलेला नसल्याने ती जमीन सरकारने ताब्यात घेऊन त्या जागी अत्याधुनिक कचरा प्रकल्प उभारण्याची तयारी केली असल्याचे या आदेशात म्हटले आहे.
या आदेशावर पालिकेच्या आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असता काही नगरसेवकांनी पालिकेने सरकारने दिलेला निधी संपूर्णपणे वापरला असल्याने परत करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यासाठी सरकारने हा निधी वसूल करण्यास हरकत घेतली.
या वेळी या ठिकाणी कचरा प्रकल्प उभारण्यास कुणाचाही विरोध नाही, तर बाहेरून कचरा आणण्यास आपला कायमचा विरोध असल्याचे नगरसेवक पुष्कल सावंत व बाबूराव फ˜ो देसाई यांनी स्पष्ट केले.
नगराध्यक्षा कार्मेलीन फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीला कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, उपनगराध्यक्ष प्रदीप नाईक यांच्यासह सर्व बाराही नगरसेवक उपस्थित होते. बैठकीनंतर बोलताना आमदार काब्राल म्हणाले की, कुडचडे-काकोडा नगरपालिकेने काकोडा येथे विदेशी तंत्रज्ञान वापरून जो कचरा प्रकल्प उभारण्याची योजना आखली आहे, ती ९९ टक्के मान्य झाली असून पालिका आपले नियम घालून ती जमीन सरकारकडे सुपूर्द करण्यास राजी झाले असून या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत कचरा प्रकल्प उभारला जाणार असल्याचे सांगितले. पालिका संचालनालयाच्या आदेशावर पालिका आपल्या अटी व नियम तयार करून पाठविणार असून पालिका संचालनालय त्यावर योग्य निर्णय घेईल, असेही काब्राल म्हणाले.
या आदेशानुसार पालिकेच्या काही नगरसेवकांनी या प्रस्तावास आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे अमान्य केले व पालिकेच्या अटी व नियम पालिका संचालनालयाने मान्य केल्यावर आमची अंतिम मान्यता देण्यात येणार असल्याचे सांगितले. (लो.प्र.)

Web Title: Refuse to return the funds to the garbage project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.