शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली, मुंबईच्या ब्लॅक मनीची गोव्यात घटली गुंतवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2017 12:52 IST

दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आदी भागांतील बडे राजकारणी, उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक वगैरे आपला काळा पैसा गोव्यात सेकंड होम खरेदी करणो तसेच अनेक फ्लॅट व बंगले तसेच मोठ्या जमिनी खरेदी करण्यासाठी यापूर्वी सतत गुंतवत आले आहेत.

पणजी :  दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आदी भागांतील बडे राजकारणी, उद्योगपती, बांधकाम व्यावसायिक वगैरे आपला काळा पैसा गोव्यात सेकंड होम खरेदी करणो तसेच अनेक फ्लॅट व बंगले तसेच मोठ्या जमिनी खरेदी करण्यासाठी यापूर्वी सतत गुंतवत आले आहेत. मात्र नोटबंदी, प्राप्ती कर खात्याचे कडक झालेले कायदे तसेच जीएसटीविषयक अडचणींनंतर गोव्यात ब्लॅक मनीचा ओघ मंदावला आहे, अशी माहिती जाणकारांकडून मिळते. गोव्यात पूर्वीसारखी आता बड्या परप्रांतीयांकडून फ्लॅट व बंगल्यांची खरेदी होत नाही.

गोव्यातील कळंगुट, कांदोळी, सिकेरी, बागा, वागातोर, मोरजी,आश्वे, मिरामार, दोनापावल, माजोर्डा, केळशी, सेर्नाभाटी या किनारपट्टीमध्ये जमिनींचे आणि फ्लॅटचे प्रति चौरस मीटर दर प्रचंड आहेत. काही भागांत एक लाख रुपये प्रति चौरस मीटर तर काही ठिकाणी सव्वा लाख रुपये प्रति चौरस मीटर दराने फ्लॅटची विक्री केली जात आहे. 90च्या दशकापासून गोव्यात देशभरातील काळ्य़ा पैशाची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू झाली. ब्लॅक मनीमुळेच गोव्यातील रियल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढतानाच जागांचे भावदेखील वाढले. 

बॉलिवूडमधील अनेक मंडळींचे तसेच काही क्रिकेटपटूंचे फ्लॅट व भूखंड गोव्यात आहेत. देशातील काही आजी-माजी खासदारांच्याही मालमत्ता गोव्यात आहेत. महाराष्ट्रातील काही बड्या राजकारण्यांनीही गोव्यातील रियल इस्टेट व हॉटेल उद्योगांमध्ये पैसा गुंतवला आहे. शांत आणि निसर्ग सौंदर्याने संपन्न अशा गोव्यात आपले एक सेकंड होम असावे, अशी इच्छा देशातील श्रीमंत मंडळींमध्ये असतेच. अनेकांकडून इच्छा पुरी केली जाते. गोव्यात ब्लॅक मनीची गुंतवणूक वाढल्यानंतर फ्लॅट आणि बंगले खरेदी करणे गोमंतकीयांना परवडेनासे झाले. अजूनही गोव्यात मालमत्तांचे दर खाली आलेले नाहीत. परप्रांतीयांकडून अजूनही गोव्यात मालमत्ता खरेदी केल्या जातात पण त्यांचे प्रमाण गेल्या पाच वर्षाच्या तुलनेत आता खूपच कमी आहे, असे काही बांधकाम व्यवसायिकांनी आपले नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले.

गोव्यातील कदंब पठार, बांबोळी पठार, ताळगाव मतदारसंघ अशा ठिकाणी हजारो फ्लॅट्सचे बांधकाम सध्या सुरू आहे. नवनवी पंचतारांकित हॉटेल्स गोव्यात उभी राहत आहेत. किनारपट्टीमधील बहुतांश जागा हॉटेल व्यवसायिकांनी ताब्यात घेतलेली आहे. बांधकामे वाढली तरी, दर कमी झालेले नाहीत. परप्रांतांमधून गोव्याच्या रियल इस्टेटमध्ये आता पूर्वीसारखा काळा पैसा येत नाही. नोटबंदीनंतर प्रमाण घटले. प्राप्ती कर खात्याने आपले कायदे व नियम कडक केल्यानंतर गोव्यातील बांधकाम व्यवसायिकही जास्त धोके पत्करत नाहीत. त्यामुळेही काळ्या पैशाचा ओघ गोवा प्रदेशात मंदावला आहे. मात्र त्याचे प्रमाण नगण्यही झालेले नाही. 

टॅग्स :real estateबांधकाम उद्योगgoaगोवाMumbaiमुंबई