रावणफोंड येथे युवकाला भोसकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2016 01:32 IST2016-01-04T01:31:59+5:302016-01-04T01:32:47+5:30
मडगाव : रावणफोंड येथे दोन गटांत झालेल्या भांडणामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने

रावणफोंड येथे युवकाला भोसकले
मडगाव : रावणफोंड येथे दोन गटांत झालेल्या भांडणामध्ये एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले. रोहन चव्हाण (१९) असे जखमीचे नाव आहे. तसेच दोन्ही गटांतील सदस्य मडगाव पोलीस स्थानकात जमल्याने काहीवेळ वातावरण तंग झाले होते.
सविस्तर माहितीनुसार, रावणफोंड येथे सायंकाळी दोन गटांत भांडण झाल्याने एका सहा सदस्यांच्या गटाने दुसऱ्या गटातील रोहन चव्हाणला मारहाण केली. यामध्ये गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला हॉस्पिसिओमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, रोहनची अवस्था गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी गोमेकॉत दाखल करण्याचा आले. दरम्यान, रोहनच्या मित्रांच्या सांगण्यानुसार, रोहनवर दुसऱ्या गटातील आरव नामक युवकाने चॉपरने हल्ला केला. याप्रकरणी मडगाव पोलीस तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)