शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत वीज बिलांचा 'शॉक', एफपीपीसीएमुळे वाढले दर  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 15:18 IST

ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळासाठी एफपीपीसीएमुळे वीज दर वाढले आहेत. घरगुती वापराच्या विजेसाठी 400 युनिटपेक्षा अधिक वापर झाल्यास प्रती युनिट 18

पणजी - गोव्यात भर दिवाळीत ग्राहकांना वीज बिल दरवाढीचा फटका बसणार आहे. एफपीपीसीएमुळे (फ्युअल अ‍ॅण्ड पॉवर परचेज कॉस्ट एडजस्टमेंट) वाढीव रकमेची वीज बिले ग्राहकांच्या हाती पडणार असून पुढील तीन महिन्यांसाठी ही दरवाढ लागू असल्याने नागरिकांच्या खिशाला कात्री लागणार आहे. 

ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांच्या काळासाठी एफपीपीसीएमुळे वीज दर वाढले आहेत. घरगुती वापराच्या विजेसाठी 400 युनिटपेक्षा अधिक वापर झाल्यास प्रती युनिट 18 पैसे दरवाढ होणार आहे. वीजमंत्री निलेश काब्राल यांच्याशी संपर्क साधला असता राज्य सरकारने युनिटचे दर वाढविलेले नाहीत तर एफपीपीसीएमुळे ही दरवाढ झालेली आहे, असा दावा त्यांनी केला. ते म्हणाले की,‘इंधन व कोळशाचे दर वाढल्यास वीज निर्मितीवरील खर्चही वाढतो त्यामुळे सरकारला वीज खरेदीसाठी जादा पैसे बाहेर काढावे लागतात. एफपीपीसीएमुळे दरवाढ होणार असली तरी ती अल्प आहे. तीन महिन्यांनी आढावा घेतला जातो. गेल्या तिमाहीत दर खाली आले होते. सरकारने युनिटचे दर वाढविलेले नसून नजीकच्या काळातही दरवाढ करण्याचा विचार नाही. राज्य सरकार बाहेरुन वीज घेते आणि फ्युअल अ‍ॅण्ड पॉवर परचेज कॉस्ट एडजस्टमेंट करारानुसार प्रत्येक तिमाहीत दरांचा आढावा घेतला जातो. कधी दर कमी होतात तर कधी वाढतात. संयुक्त वीज नियमन आयोगाच्या निर्देशानुसारच हे केले जाते.’प्राप्त माहितीनुसार ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीत घरगुती वापराच्या विजेसाठी 0 ते 100 युनिटकरीता प्रति युनिट 7.39 पैसे, 101 ते 200 युनिटकरिता 9.90 पैसे, 201 ते 300 युनिटकरिता 12.80 पैसे, 301 ते 400 युनिटकरिता प्रति युनिट 15.97 पैसे तर 400 पेक्षा जास्त युनिटकरिता प्रती युनिट 18.08 पैसे अशी दरवाढ झालेली आहे. 

व्यावसायिक आस्थापनांसाठी कमी दाबाच्या विजेचे दरही वाढलेले आहेत. 0 ते 100 युनिटकरिता प्रती युनिट 17.95 पैसे, 101 ते 200 युनिटकरिता प्रती युनिट 19.18 पैसे, 201 ते 400 युनिटकरिता प्रती युनिट 21.91 पैसे तर 400 पेक्षा जास्त युनिटकरिता प्रती युनिट 24.15 पैसे अशी दरवाढ झालेली आहे. वीज खात्याच्या वरिष्ठ अभियंत्याच्या दाव्यानुसार गोव्यात इतर राज्यांपेक्षा विजेचे दर तुलनेत कमीच आहेत. राज्य सरकारने घरगुती वापरासाठीच्या कमी दाबाच्या विजेचे दर 0 ते 100 युनिटकरीता प्रति युनिट 1 रुपया 40 पैसे, 101 ते 200 युनिटकरिता 2 रुपये 10 पैसे, 201 ते 300 युनिटकरिता 2 रुपये 65 पैसे, 301 ते 400 युनिटकरिता प्रति युनिट 3 रुपये 45 पैसे तर 400 पेक्षा जास्त युनिटकरिता प्रती युनिट 4 रुपये असे दर निश्चित केलेले आहेत. या व्यतिरिक्त  एफपीपीसीएचा अतिरिक्त भार लागू झाला आहे. 

टॅग्स :electricityवीजgoaगोवाDiwaliदिवाळी