शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

बाप्तिस्ता डिकॉस्ता खून समलिंगी अत्याचारातून, कोलवा पोलिसांकडून रिक्षा ड्रायव्हरला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2018 18:05 IST

मडगावपासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या बेताळभाटी येथील लवर्स बिचवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या बाप्तिस्ता डिकॉस्ता या रेंट अ बाईकचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाच्या खूनाचे गुढ उलगडले असून या प्रकरणात कोलवा पोलिसांनी याच परिसरातील रिक्षा ड्रायव्हर अमन कवाटिया याला अटक केली आहे.

- सुशांत कुंकळयेकर

 मडगाव :  मडगावपासून सात कि.मी. अंतरावर असलेल्या बेताळभाटी येथील लवर्स बिचवर तीन दिवसांपूर्वी झालेल्या बाप्तिस्ता डिकॉस्ता या रेंट अ बाईकचा व्यवसाय करणा-या व्यावसायिकाच्या खूनाचे गुढ उलगडले असून या प्रकरणात कोलवा पोलिसांनी याच परिसरातील रिक्षा ड्रायव्हर अमन कवाटिया याला अटक केली आहे. अनैसर्गिक संभोगाच्या बळजबरीतून हा खून झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष पोलिसांनी काढला आहे.मागच्या रविवारी बेताळभाटी बिचवर डिकॉस्ता याचा मृतदेह सापडला होता. त्याचा गळा चिरुन खून केला होता. मात्र खून करतेवेळी मयत अर्धनग्न अवस्थेत असल्याने या खूनाबद्दलचे गूढ वाढले होते. मंगळवारी कोलवा पोलिसांनी या खुन्याला जेरबंद केले. खुनी अमन हा मूळ गुजराती असून तो गोव्यातच वाढला आहे. संशयित या भागात रिक्षा चालविण्याचे काम करत होता. त्याच्या गरिबीचा फायदा उठवून मयताकडून त्याच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले जात असल्यामुळेच हा खून केला असावा असा प्राथमिक निष्कर्ष व्यक्त केला जात आहे.शनिवारी रात्री मयत डिकॉस्ता व संशयित अमन हे दोघेही बेताळभाटीच्या या बिचवर होते. त्यानी रात्रीच्यावेळी दारुही पिली होती. जवळच्याच दुकानातून त्यानी ही दारु खरेदी केली होती. रात्रीच्यावेळी मयताकडून संशयितावर बळजबरीचा प्रयत्न होत असतानाच हा खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.मिळालेल्या माहितीप्रमाणो, मागची कित्येक वर्षे संशयित मयताच्या संपर्कात होता. सुरुवातीला मयताकडून पैशांच्या मोबदल्यात अनैसर्गिक संभोग करण्याचे प्रकार घडले होते. त्यानंतर हे प्रकार वारंवार घडू लागले. त्यातही संशयिताला मयताकडून पैशांचा मोबदला मिळत नसे. त्यामुळेच हा खून झाला असावा असा कयास व्यक्त केला जात आहे.ज्या रात्री हा खून झाला त्या दिवशी एका गाडी विक्रीच्या व्यवहारातून मयताकडे पैसे आले होते. मयताने संशयिताला तीन हजार रुपये देण्याचा वायदा करुन त्या रात्री बिचवर नेले होते. मात्र मयताकडून पैसे देण्यास टाळाटाळ झाल्यानंतर हा खून करण्यात आला असावा असा पोलिसांचा निष्कर्ष आहे. या घटनेनंतर मयताकडील पैसे तसेच सोन्याचे दागिने गायब झाले होते.

टॅग्स :goaगोवाCrimeगुन्हा