वीज बिलांसाठी रांगा
By Admin | Updated: November 14, 2015 01:52 IST2015-11-14T01:51:52+5:302015-11-14T01:52:03+5:30
पणजी : सहकारी पतसंस्थांनी अनेक ठिकाणी वीज बिले स्वीकारणे बंद केल्याने ग्राहकांना बिले भरण्यासाठी वीज खात्याच्या कार्यालयांमध्ये रांगा लावाव्या लागत

वीज बिलांसाठी रांगा
पणजी : सहकारी पतसंस्थांनी अनेक ठिकाणी वीज बिले स्वीकारणे बंद केल्याने ग्राहकांना बिले भरण्यासाठी वीज खात्याच्या कार्यालयांमध्ये रांगा लावाव्या लागत असून त्यामुळे वेळेचा अपव्यय तर होत आहेच, शिवाय दूरवर पायपीट करावी लागत आहे.
बिलामागे दिले जाणारे कमिशन अत्यल्प असल्याने ते वाढवून दिले जावे. प्रत्येक बिलामागे कमीत कमी १0 रुपये किंवा बिलाच्या रकमेच्या २ टक्के जी काही रक्कम जास्त असेल ती कमिशन म्हणून द्यावी, अशी मागणी पतसंस्था करीत आहेत. सहकार भारतीच्या गोवा शाखेने ही मागणी उचलून धरली आहे. पेडणे, डिचोली, कुडचडे भागातील पतसंस्थांनी बिले स्वीकारणे बंद केले आहे.
सहकार भारतीचे गोवा प्रदेश अध्यक्ष प्रकाश शंकर वेळीप यांनी या मागणीचे समर्थन केले. ते म्हणाले की, प्रत्येक बिलामागे सध्या दीड रुपया पतसंस्थेला कमिशन म्हणून मिळते, ते अगदीच अपुरे आहे. या कामासाठी मनुष्यबळ लागते, कागदोपत्री व्यवहार करावे लागतात आणि उत्पन्न काहीच मिळत नाही. त्यामुळे पतसंस्थांसाठी ती डोकेदुखी ठरली आहे.
दोन महिन्यांपूर्वी सहकार परिषद झाली. त्या वेळी वीजमंत्री मिलिंद नाईक यांच्याकडे हा विषय मांडला होता व त्यांनी कमिशन वाढवून देण्याची तयारीही दाखवली होती. मात्र, नंतर काहीच झाले नाही. (पान २ वर)