लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: गोव्याचे सुपूत्र राजेंद्र आर्लेकर यांची केंद्र सरकारने काल केरळमध्ये राज्यपालपदी नियुक्ती केली आहे. बिहारहून आर्लेकर त्यांची बदली करून केरळचे राज्यपालपद सोपवण्यात आहे. तसा आदेश जारी झाला आहे.
बिहारमध्ये राज्यपाल म्हणून आरिफ मोहम्मद खान यांची नियुक्ती केली आहे. केरळ हे आर्लेकर यांच्यासाठी तिसरे राज्य आहे. आर्लेकर यांनी पूर्वी हिमाचल, त्यानंतर कालपर्यंत ते बिहारचे राज्यपाल होते. आता केरळमध्ये नियुक्ती झाल्याने आर्लेकर यांनी 'लोकमत'शी बोलताना आनंद व्यक्त केला.