पावसाची रिपरिप चालूच
By Admin | Updated: June 16, 2015 01:17 IST2015-06-16T01:16:50+5:302015-06-16T01:17:02+5:30
पणजी : शनिवार व रविवार असे दोन दिवस पावसाने धरलेला पावसाचा जोर सोमवारी किंचित ओसरला. रविवारी २४ तासांत सरासरी २ इंच एवढ्या

पावसाची रिपरिप चालूच
पणजी : शनिवार व रविवार असे दोन दिवस पावसाने धरलेला पावसाचा जोर सोमवारी किंचित ओसरला. रविवारी २४ तासांत सरासरी २ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात पावसाची रिपरिप सोमवारीही कायम राहिली. राज्यात सर्वच ठिकाणी पाऊस पडला. पणजी, मडगाव, काणकोण, म्हापसा, दाबोळी व मुरगाव या भागात पाऊस अधिक पडला, अशी माहिती माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली. पाऊस आणखी दोन दिवस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मान्सूनसाठी हवामान पोषक असल्यामुळे पाऊस चालूच राहणार आहे. दरम्यान, पणजीत सर्वाधिक म्हणजे १५.८ इंच,
तर सर्वांत कमी पाऊस वाळपई येथे ७.१ इंच एवढा नोंद झाला आहे.