शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पावसामुळे पडझड सुरूच, ऑरेंज अलर्ट जारी; सतर्कतेचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2024 09:47 IST

२४ तासांत १०१ मिमी वृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने जोर धरला असून काल, शनिवारीही सर्वत्र मुसळधार पडला. यामुळे अनेक ठिकाणी झाडे पडली. . तर काही ठिकाणी पावसामुळे घराच्या भिंतींची पडझड झाली. गेल्या २४ तासांत तब्बल १०१ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे धरणांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. डिचोली, साळगावसह मडगाव परिसरात पडझडीच्या अनेक घटना घडल्या. बाणावली येथे माड पडून महिल महिला जखमी झाल्याची घटना घडली.

पावसाचा जोर पाहता हवामान खात्याने पुढील तीन दिवस ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात न जाण्याचा इशाराही दिला आहे. गेले आठ दिवस राज्यात मुसळधार सुरूच असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात १ जून ते आतापर्यंत ६८.३३ पावसाची नोंद झाले आहे. पावसामुळे काल अनेकांच्या घरात पाणी शिरले. घरांवर झाडे उन्मळून पडून मोठ्या प्रमाणात लोकांचे नुकसान झालेले आहे. तसेच धरणाप्रमाणे राज्यातील सर्व नद्या तसेच उपनद्या ओसांडून वाहू लागल्या आहेत. त्याचा फटका शेती बागायतींना मोठा फटका बसला आहे.

आमठाणे व अंजुने धरण पातळी वाढू लागलेली असून आमठाणे धरणाची पातळी भरण्याच्या मार्गावर आहे. सोमवारी किंवा मंगळवारी पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. 

साळगावात भिंत कोसळली

पावसामुळे साळगाव येथील विष्णू कामत यांच्या घराची भिंत कोसळून दीड लाखांचे नुकसान झाले. पिळर्ण अग्निशमन दलाच्या जवानांनी पडझड झालेला भाग हटविला. भितीसोबत घराच्या छपराचाही काही भाग पडल्याने घरातील सामानाचे मोठे नुकसान झाले.

आतापर्यंत ६८.३३ इंच पाऊस

राज्यात १ जून ते १३ जुलैपर्यंत ६८.३३ इंच पावसाची नोंद झाली आहे. तर वाळपई केंद्रात ८१.५४ इंच सर्वाधिक जास्त पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे साखळी, सांगे, केपे, काणकोण, मडगाव या केंद्रावरही मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे.

डिचोलीत हानी

डिचोली तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तालुक्यातील बागायतीची तसेच काही घरांची हानी झाली असून अग्निशमन दलाच्या जवानांनी मदत कार्य केले. नार्वे येथील सप्तकोटेश्वर मंदिराच्या परिसरातील झाड पडून नुकसान झाले. तसेच संजीव रावळ यांच्या घरावर झाड पडून हानी झाली. नार्वे येथे वीज वाहिन्यांवर झाड पडल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला. तालुक्यात दिवसभरात अडीच इंच आसपास पावसाची नोंद झाली. 

टॅग्स :goaगोवाRainपाऊसmonsoonमोसमी पाऊस