पावसाचा मारा कायम; अनेक ठिकाणी पडझड

By Admin | Updated: June 19, 2015 01:37 IST2015-06-19T01:37:27+5:302015-06-19T01:37:54+5:30

पणजी : गुरुवारी राज्यभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जोराच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून आणखी दोन दिवस पाऊस चालूच राहणार

Rain stays forever; Downfall in many places | पावसाचा मारा कायम; अनेक ठिकाणी पडझड

पावसाचा मारा कायम; अनेक ठिकाणी पडझड

पणजी : गुरुवारी राज्यभर पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. जोराच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झाली असून आणखी दोन दिवस पाऊस चालूच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. राज्यात सरासरी १५ इंच, तर पणजीत २१ इंच एकूण पावसाची नोंद झाली आहे.
पेडणे, साखळी म्हापसा, पणजी, मुरगाव, दाबोळी, मडगाव, सांगे, केपे व काणकोणमध्ये जोरदार वृष्टी झाली. बुधवारी मध्यरात्री व गुरुवारी सकाळीही मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळला. सांगे, दाबोळी, साखळी व म्हापसा या भागात सर्वाधिक वृष्टी झाली. मडगावात सर्वाधिक ४ इंच, तर सांगे व साखळीत ३.७ इंच पाऊस पडला.
कुंकळ्ळीत वादळी वाऱ्यामुळे पोयतामाडो येथे दहा घरांवर झाडे उन्मळून पडली. रात्री ८.३०च्या सुमारास कुलवाडा, भिंवसा, तांयगिरे भागात मोठ्या प्रमाणात पडझड झाली. रात्री उशिरापर्यंत घरांवरील झाडे हटविण्याचे काम सुरू होते. (पान २ वर)

Web Title: Rain stays forever; Downfall in many places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.