शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पावसाचा हाहाकार; जनजीवन विस्कळीत, रस्त्यांना नदीचे स्वरुप

By समीर नाईक | Updated: July 7, 2024 14:40 IST

अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनाची खास टीम यांचीही धावपळ सकाळपासून सुरु आहे.

समीर नाईक / गोवा पणजी: रविवारी सकाळपासून जोरदार पावसाने राज्याला झोडपून काढले. अनेक ठिकाणी दरड कोसळल्याचे, पडझड झाल्याची घटना समाेर आल्या आहेत, तर आले आहे. पेडणे, डिचोली, साखळी, वाळपई, फोंडा, कुठ्ठाळी, सांगे, काणकोण या भागात झाडे, घरे कोसळण्याचे प्रकारही समोर आले आहे. अनेक ठीकाणी लोकांच्या घरांमध्ये देखील पाणी शिरले आहे. अग्निशामक दल आणि आपत्ती व्यवस्थापनाची खास टीम यांचीही धावपळ सकाळपासून सुरु आहे.

गोवा रेड अलर्टवर असून, रविवारी पहाटेपासूनच न थांबता जोरदार पाऊस सुरु आहे. यातून जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेकांनी घरातून बाहेर निघणे टाळले आहे. दरड, झाडे कोसळल्याने अनेक रस्ते बंद ठेवण्यात येत आहे, परीणामस्वरुप वाहतुकही ठप्प झाली आहे. अनेक ठिकाणी सकाळपासूनच वीजही गायब झालेली आहे. डिचोली, सत्तरीतील अनेक नद्यांच्या पातळीत वाढ झालेली देखील दिसून येत आहे.

 स्मार्ट सिटी पणजीतील रस्त्यांना नदीचे स्वरुप 

रविवारी पडलेल्या स्मार्ट सिटी पणजीतील रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. अनेक मुख्य रस्ते पाण्याखाली गेले आहे. साेमवारी पावसाचे प्रमाण तुलनेत खुप कमी होते, तरी पाटो प्लाझा येथील अनेक रस्त्यांवर भरतीमुळे पाणी तुंबले होतेे. पार्किंग केलेली वाहने देखील अर्धी बुडलेली होती. यापेक्षा अधिक बिकट स्थिती रविवारी पाटो भागाची झाली आहे. वाहनचालकांना या पाण्यातून वाट काढणे देखील कठीण बनले आहे. पाटोत अनेक ठिकाणी सांडपाणी वाहीनींचे चेंबर्स फुल्ल झाल्यानेे हे पाणी देखील पावसात साठलेल्या पाण्यात मिसळल्याने दुर्गंधी पसरली आहे.

 अग्निशामक दलाची चेतावणी राज्यात सुरु असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर विनाकारण घरातून बाहेर न जाण्याची चेतावणी अग्नीशामक दलाने दिली आहे. तसेच ज्यांची घरे मातीची आहे, त्यांनी विषेश काळजी घेत, आपल्याला सुरक्षित ठेवावे. अनेक ठिकाणी पडझड होत असल्याने आम्हाला वेळेत घटनास्थळी पोहचणे शक्य होत नाही, त्यामुळे लोकांनी प्राथमिक स्तरावर काळजी घ्यावी, असेही दलाने म्हटले आहे.

टॅग्स :goaगोवा